Omicron : राज्यात आढळलेला पहिला ओमिक्रॉन व्हेरिएंटग्रस्त रूग्ण कोरोनामुक्त
कल्याण डोंबिवलीकरांसाठी चांगली बातमी आहे. डोंबिवलीत आढळलेला पहिला ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळलेला रूग्ण बरा झाला आहे. हा रूग्ण 24 नोव्हेंबरला दक्षिण अफ्रिकेच्या केपटाऊनहून डोंबिवलीत आला होता. हा 33 वर्षीय रुग्ण करोना मुक्त झाला आहे. त्याचा ओमिक्रॉन कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढील 7 दिवस त्याला घरगुती विलगीकरणात राहण्याच्या सूचना […]
ADVERTISEMENT
कल्याण डोंबिवलीकरांसाठी चांगली बातमी आहे. डोंबिवलीत आढळलेला पहिला ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळलेला रूग्ण बरा झाला आहे. हा रूग्ण 24 नोव्हेंबरला दक्षिण अफ्रिकेच्या केपटाऊनहून डोंबिवलीत आला होता. हा 33 वर्षीय रुग्ण करोना मुक्त झाला आहे. त्याचा ओमिक्रॉन कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
पुढील 7 दिवस त्याला घरगुती विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली. तर उर्वरित नायजेरिया मधून आलेल्या त्या चार करोना ग्रस्त रुग्णाच्या जिनोम सिक्वेन्सीनग अहवालाची अद्यापी प्रतीक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.
Omicron Variant : ओमिक्रॉन भारतात फोफावतोय! देशातील रुग्णांचा आकडा 21 वर
हे वाचलं का?
24 नोव्हेंबर 2021 रोजी द. अफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरिएंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झालं होतं. हा नव्या व्हेरिएंटचा राज्यातील पहिलाच रुग्ण होता. हा तरुण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असून त्याने कोणतीही कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर 2024 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरुपाचा असून तो कल्याण-डोंबिवली येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होता. आज त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
व्हेरिएंट आणि म्युटेशन म्हणजे काय?
ADVERTISEMENT
व्हायरसचाही जिनोम सिक्वेन्स (जनुकीय रचना) असतो. व्हायरच्या जिनोममध्ये सातत्याने बदल होतं जातो, त्यालाच म्युटेशन असं म्हटलं जातं. कोरोना व्हायरच्या जिनोममध्येही सातत्याने बदल होत असून, जगभरात चार व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (अल्फा, बीटा, गामा, डेल्टा ), तर दोन व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट (ल्युम्ब्डा, म्यू) आढळून आले आहेत. यातच आता दक्षिण आफ्रिकेत B.1.1.529 हा व्हेरिएंट आढळून आला असून, तो व्हेरिएंट ऑफ कन्सर्न आहे. B.1.1.529 या कोरोना व्हेरिएंट जागतिक आरोग्य संघटनेनं ओमिक्रॉन व्हेरिएंट असं नाव दिलं आहे.
दक्षिण आफ्रिकेतील नेटवर्क फॉर जिनोमिक्स निगराणी नेटवर्क अर्थात NGS-SA (Network for Genomics Surveillance in South Africa) ला सोमवारी (22 नोव्हेंबर) हा नवीन व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट आल्याचं प्रथम जाहीर करण्यात आलं. या व्हेरिएंटमध्ये SARS-CoV-2 संबंधित व्हायरस आढळून आले आहेत.
Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत, भारत सरकारकडून नव्या गाइडलाइन जारी
ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये कोरोनाचे अनेक म्युटेशन आढळून आले आहेत. त्यामुळे या व्हेरिएंटचा संसर्गांचा वेग प्रचंड असल्याचं शास्त्रज्ञांकडून सांगितलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेत गेल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल चार पटीने वाढ झाली असून, ही वाढ B.1.1.529 चा आढळून आल्यानंतर झाल्याचं दिसून आलं आहे.
NGS-SA ने सांगितलं की जोहान्सबर्ग आणि प्रिटोरियाचा समावेश असलेल्या गौतंग प्रातांत रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. कोरोना उद्रेक झाल्यानं ही रुग्णवृद्धी झाली असल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे.
ओमिक्रॉन व्हेरिएंट का धोकादायक मानला जातोय?
NGS-SA ने नव्या व्हेरिएंटच्या म्युटेशनबद्दल सांगितलं की ‘B.1.1.529 म्युटेशनची जिनोम सिक्वेन्स (जनुकीय रचना) खूप दुर्मिळ आहे. 30 म्युटेशन व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये आहेत. स्पाईक प्रोटीन हा असा भाग असतो, जिथे लस परिणामकारक ठरते. त्याचबरोबर स्पाईक प्रोटीनद्वारेच व्हायरस मानवी शरीरात प्रवेश करून शरीरातील पेशी संक्रमित करण्यास सुरूवात करतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT