MLC Election Result: महाविकास आघाडीला मोठं यश, आणखी एक उमेदवार विजयी!
Vikram Kale Won from Aurangabad Teacher Constituency: औरंगाबाद: शिक्षक-पदवीधर विधान परिषद निवडणूक (Vidha Parishad Election) ही महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) लाभदायक ठरत असल्याचं दिसत आहे. कारण महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवार आता निवडून आल्याचं समजतं आहे. खरं तर या निवडणुकांमध्ये भाजपने (BJP) कोकणातून आपलं खातं उघडलं होतं. मात्र, नागपूर (Nagpur) आणि औरंगाबाद (Aurangabad) या दोन्ही मतदारसंघात […]
ADVERTISEMENT

Vikram Kale Won from Aurangabad Teacher Constituency: औरंगाबाद: शिक्षक-पदवीधर विधान परिषद निवडणूक (Vidha Parishad Election) ही महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) लाभदायक ठरत असल्याचं दिसत आहे. कारण महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवार आता निवडून आल्याचं समजतं आहे. खरं तर या निवडणुकांमध्ये भाजपने (BJP) कोकणातून आपलं खातं उघडलं होतं. मात्र, नागपूर (Nagpur) आणि औरंगाबाद (Aurangabad) या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. (one more success for mahavikas a ghadi vikram kale won in aurangabad teachers constituency)
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून मविआचे विक्रम काळे चौथ्यांदा विजयी
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे विक्रम काळे (Vikram Kale) यांनी चौथ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या किरण पाटील यांचा पराभव केला आहे. विक्रम काळे यांच्या विजयानंतर जोरदार जल्लोष औरंगाबादमध्ये करण्यात येत आहे. या मतदारसंघात खरं तर तिहेरी लढत होती. राष्ट्रवादीचे विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील आणि सूर्यकांत विश्वासराव यांच्यामध्ये चुरसीचा सामना पाहायला मिळाला.
पण आपला तीन निवडणुकीच्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काळे यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. विक्रम काळे यांनी 20195 मतं मिळवून या निवडणुकीत विजय मिळवला. तर भाजपच्या किरण पाटील यांना 13570 मतं मिळाली. तर अपक्ष उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी भाजपच्या पाटलांपेक्षा अधिक म्हणजेच 13604 मतं मिळवली.