कॉलेजच्या ‘One Night Stand’ने बरबाद केलं महिलेचं आयुष्य, असं नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एड्स हा असाध्य रोग आहे ज्याची लक्षणे अनेक वर्षे शरीरात लपून राहू शकतात. या आजाराचा सामना करणाऱ्या एका महिलेची दुःखद कहाणी खूपच हृदयद्रावक आहे. कॉलेजच्या दिवसात झालेल्या एका चुकीने या महिलेचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. जाणून घ्या एड्स दिनी एका महिलेची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी तिच्यात शब्दात..

ADVERTISEMENT

एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलेची कहाणी, जाणून घ्या तिच्याच शब्दात..

सप्टेंबर 2001 मध्ये, माझ्या कॉलेज रूममेटला आणि मला अचानक डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. आम्हाला वाटलं की, आम्ही बराच वेळ उपाशी आहोत आणि भूक लागल्याने असे होत असेल. त्यामुळे आम्ही कॅफेटेरियात गेलो. पण त्यानंतर मी बेशुद्ध पडले.

हे वाचलं का?

कॅम्पस आरोग्य केंद्रातील नर्सने मला सांगितले की मी गर्भवती नाही, परंतु मला यूरीनरी ट्रॅक्ट इंफेक्शन (यूटीआय) आहे. त्यानंतर मला काही अँटीबायोटिक्स देऊन घरी पाठवण्यात आले. पण काही आठवड्यांनंतर माझे वजन अचानक कमी होऊ लागले. मी खूप आजारी पडले. मी ड्रग्ज घेते अशी लोकं माझी चेष्टा करू लागले. मी खूप अस्वस्थ आणि चिंताग्रस्त होते. माझ्यासोबत काहीतरी फार वाईट होणार आहे असे मला वाटले, पण मी मनातली भीती काढून टाकली. दोन महिन्यांनंतर मला अचानक बरे वाटू लागले.

त्या रहस्यमय आजाराच्या जवळपास एक वर्षानंतर मी 2002 साली गरोदर राहिले. याची तपासाणी करण्यासाठी मी स्थानिक आरोग्य विभागाशी संपर्क साधला. ते इतके व्यस्त होते की त्यांनी मला पहिल्या गर्भधारणेच्या चाचणीसाठी खूप पुढची तारीख दिली. त्यामुळे माझी काळजी घेणारे कोणी नव्हते आणि कोणतीही चाचणी केली गेली नाही. जुलै 2003 मध्ये, मी एका स्थानिक रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला आणि तिच्या सर्व चाचण्या तिथे आपोआप झाल्या.

ADVERTISEMENT

तेव्हा डॉक्टरांना कळले की, मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, कारण माझ्या बाळाच्या शरीरात अँटीबॉडीज (संसर्गांशी लढणारे प्रथिने) आहेत. जसे सर्व मुले स्वतःची प्रतिकारशक्ती निर्माण करण्यापूर्वी करतात. रक्तातील एचआयव्ही अँटीबॉडीजमुळे हे स्पष्ट झाले की, हा विषाणू माझ्याच शरीरात आहे आणि आता मूलही त्याच्या संपर्कात आले आहे.

ADVERTISEMENT

काही महिन्यांपासून, मी माझ्या बाळाची नियमित चाचणी केली आणि तिला अँटीरेट्रोव्हायरल औषधे दिली ज्यामुळे शरीरात स्वतःहून एचआयव्ही अँटीबॉडीज विकसित होत नाहीत याची खात्री होते.

या दरम्यान माझे मन पुन्हा एकदा त्या घटनाक्रमाकडे गेले जेव्हा मी कॉलेजमध्ये आजारी पडले होते आणि माझे वजन झपाट्याने कमी होऊ लागलेलले. ही एचआयव्ही संसर्गाची लक्षणे असू शकतात हे त्या वेळी माझ्या मनातही आले नव्हते. पण हे सर्व घडण्याच्या काही आठवड्यांपूर्वी मी ‘वन नाईट स्टँड’ केला होता. मी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले होते.

महिला म्हणाली, ‘मी पुरुषाला प्रोटेक्शन (कंडोम) वापरण्यास सांगितले. तो उठला आणि खोलीबाहेर गेला, जणू काही तो प्रोटेक्शन आणायला गेला होता. पण मी काही त्याची तपासणी केली नाही. मला फक्त त्या क्षणाचा आनंद घ्यायचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मला बाथरूममध्ये पाकिट बंद असलेला कंडोम दिसला. त्यामुळे मला HIV कसा झाला असेल हे मला माहीत होतं. मी खूप घाबरले आणि माझ्या मृत्यूचा विचार करू लागले.

एचआयव्हीचे निदान झाल्यानंतरही मला जवळजवळ एक वर्ष एड्स पीडित लोकांचा विशेष काळजी घेणारं क्लिनिक सापडलं नाही. मग मी ‘हेल्थ फॅमिली’ नावाचा कार्यक्रम निवडला ज्याने मला एका सामाजिक कार्यकर्त्याशी जोडले आणि माझ्या मुलीचे संगोपन करताना मला आधार दिला.

स्वतःला भावनिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी, मी लोकांना माझ्याबद्दल सांगू लागले. त्यांनी ते नाकारले असते तरी माझी हरकत नव्हती, कारण मला त्याबात माहीत होतं. जेव्हा ते लोकं माझ्यापासून दूर जात तेव्हा मला समजत होतं की, ती लोकं माझ्यासाठी काहीही महत्त्वाची नाहीत. असे कोणालाही वाटले नाही की मी एक दीर्घकालीन आजारासोबत जगत आहे.

तरीही, मी जो कलंक सहन केला तो खूप वेदनादायक होता. मला असं वाटत होतं की, मी प्रेमाला पात्र नाही. पण मी माझ्या कुटुंबाची खूप आभारी आहे की त्यांनी मला या आजारासह स्वीकारले आणि त्यांच्या काळजीने मला पुन्हा चांगले जीवन सुरू करण्याचा आत्मविश्वास मिळाला.

माझ्या सामाजिक कार्यकर्त्यासह, मी एचआयव्ही बाधित समुदायाचा भाग झाले. तिथल्या अनेक लोकांचे अनुभव ऐकल्यावर लक्षात आले की आपल्यात अनेकांचे आवाज दबलेले आहेत, लपलेले आहेत. यानंतर मी स्वतः माझी गोष्ट लोकांना सांगू लागले. जेणेकरून त्यांना एकटे वाटू नये. माझ्यासाठी पेचातून सुटण्याचा हा एक मार्ग बनला. 2007 साली माझी कथा एका स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. मी ते चर्च ग्रुप आणि अनेक शाळांमध्ये शेअर केली. या आजाराला कोणीही बळी पडू शकते याची जाणीव मी लोकांना करण्यास सुरुवात केली.

मला चांगले आठवते की जेव्हा मी पहिल्यांदा एचआयव्हीबद्दल ऐकले तेव्हा मी खूप घाबरले होते. पण मला त्याचीही काळजी वाटत होती. माझ्यासारख्या व्यक्तीला एचआयव्ही होऊ शकत नाही, असा माझा विश्वास होता. जेव्हा मी पहिल्यांदा माझी गोष्ट लोकांना सांगायला सुरुवात केली तेव्हा माझे लक्ष माझ्या तरुण वयावर आणि लैंगिक अनुभवाच्या अभावावर जात होते. मी पुन्हा-पुन्हा त्या रात्रीचा विचार करायचे. पण त्यावर मात करण्याचा कोणताही मार्ग नव्हता.

मी एका अशा व्यक्तीसोबत ‘वन नाईट स्टँड’ केला होता जो खूप आकर्षक होता. त्यामुळेच त्याच्याबद्दल माहिती नसतानाही मी त्याच्यासोबत ‘वन नाईट स्टँड’ केला. या चुकीसाठी मला आणि त्या व्यक्तीला माफ करायला सुमारे पाच वर्षे लागली.

जेव्हा-जेव्हा प्रेक्षकांपैकी कोणी मला त्या व्यक्तीबद्दल विचारातं तेव्हा मला त्याचा राग येतो. पण मला आशा आहे की तो, अजूनही जिवंत आणि सुरक्षित आहे. मला आशा आहे की त्याला आवश्यक असलेली मदत मिळेल. तिला प्रेम आणि निरोगी नात्याचा अनुभव मिळो.

2012 साली माझे लग्न झाले. एक व्यक्ती जो स्वतः एचआयव्ही बाधितांसोबत राहत होता. आम्ही प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना साथ दिली. दुर्दैवाने 2019 मध्ये त्यांचे निधन झाले. आता माझी मुलगी निरोगी आहे आणि ती हायस्कूलमध्ये पोहोचली आहे. मी दिवसातून एक गोळी घेऊन एचआयव्ही मॅनेज करते. मी वर्षातून दोनदा डॉक्टरांकडून तपासणी करून घेते. मी व्हायरली सरपास्ड किंवा अनडिटेक्टेबल आहे. म्हणजेच जोडीदारासोबत सेक्स केल्याने त्याच्या शरीरात व्हायरस पसरणार नाही.

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना, 8 महिन्याच्या मुलीला HIV पॉझिटिव्ह रक्त दिल्याचा आरोप

एड्स हा असाध्य रोग आहे. परंतु याचा अर्थ एचआयव्हीग्रस्त व्यक्तीसोबत राहणाऱ्या व्यक्तीलाही मृत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागेल. या आजारावर नियंत्रण मिळवता येतं. यावरील उपाय उपलब्ध आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून व्हायरसला वाढण्यापासून रोखू शकता. पण त्यावर नेमका इलाज नाही. त्यामुळे हा व्हायरस अजूनही तुमच्या शरीरात राहील. परंतु सध्याच्या युगात एचआयव्हीग्रस्त व्यक्ती सुरक्षिततेसह शारीरिक संबंध ठेवू शकतात. त्यांना मुले होऊ शकतात आणि ते आनंदी जीवनही जगू शकतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT