महाराष्ट्रातला पहिला कोरोना रुग्ण बरा होऊन घरी गेला तेव्हा..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्याला 9 मार्चला एक वर्षं पूर्ण झालं. पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमध्ये राज्यातला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आता एक वर्षाने इथे पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुधीर पटसुते यांनी दिली आहे. तर, पहिला रुग्ण आढळल्याच्या वृत्तानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून विचारपूस केलेली, त्यामुळे कर्मचा-यांचं मनोबल वाढल्याची आठवण इथल्या कर्मचा-यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितलं.

ADVERTISEMENT

‘बरोबर एक वर्षांपूर्वी आमच्याच नाचडू हॉस्पिटलमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळलेला. पहिल्यांदा भीती देखील वाटली होती. मात्र, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनकरून चौकशी केली. तेव्हा वाटलं की पंतप्रधान स्वत: फोनकरून आपल्या कामाची दखल घेतील असं कधी वाटलंच नव्हतं. आता जर ते आपल्या पाठीशी आहेत, मग घाबरायची काहीच गरज नाही. त्यांच्या फोन नंतर मोठा दिलासा मिळाला’, असं इथल्या कर्मचा-यांनी सांगितलं.

शिवाय, पहिला रुग्ण इथून बरा होऊन घरी परतला तेव्हा प्रचंड अभिमान वाटल्याची भावना इथल्या ड्रायव्हर आणि अडेंडंट यांनी व्यक्त केली. ‘पहिली व्यक्ती बरी होऊन जात असताना आम्हाला फार आनंद झाला. त्यावर त्या व्यक्तीनेच आमचे आभार मानले. तुमच्यामुळे मी आज एकदम ठणठणीत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तेव्हा आम्हालाही भारावल्या सारखं झाल्याचं’, ते म्हणाले.

हे वाचलं का?

आता एक वर्षानंतर नायडू हॉस्पिटलमधली नेमकी स्थिती काय याबद्दल बोलताना डॉ. पटसुते म्हणाले की, ‘नोव्हेंबर पर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या जास्तच होती. त्यानंतर दोन – तीन महिन्यांच्या कालावधीत रुग्णसंख्या कमी झाली होती. त्यामुळे लोकं निश्चिंत झाले. त्यामुळेच आता मार्च महिन्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं चित्रं आहे असं ते म्हणाले. गेल्या वर्षंभरात आम्ही अंदाजे पाच हजार रुग्णांवर उपचार केले. आमच्या सर्व कर्मचा-यांच्या सहकार्याने आम्ही रुग्णांवर योग्य उपचार करू शकलो याचं आम्हाला समाधान असल्याचं’, ते म्हणाले.

ADVERTISEMENT

हा व्हिडिओ देखील पाहा..

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT