Oral Health Day-कशी घ्याल मौखिक आरोग्याची काळजी?
डॉ. राजेश गायकवाड १ ऑगस्ट हा दिवस भारतात सर्वत्र मौखिक स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व म्हणजे डॉ. गोविंद ब शंकवळकर यांची पुण्यतिथी. मौखिक आरोग्यविषयी जनजागृती करणे हे या दिवसाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. भारत हा एक विकसनशील देश असल्यामुळे बहुतांशी लोकसंख्या ग्रामीण भागात स्थायिक आहे आणि अजूनही भारतातील ग्रामीण भागात अद्यापही […]
ADVERTISEMENT

डॉ. राजेश गायकवाड
१ ऑगस्ट हा दिवस भारतात सर्वत्र मौखिक स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व म्हणजे डॉ. गोविंद ब शंकवळकर यांची पुण्यतिथी. मौखिक आरोग्यविषयी जनजागृती करणे हे या दिवसाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. भारत हा एक विकसनशील देश असल्यामुळे बहुतांशी लोकसंख्या ग्रामीण भागात स्थायिक आहे आणि अजूनही भारतातील ग्रामीण भागात अद्यापही लोक मशेरी, तंबाखू इत्यादी वस्तूंचा वापर दात साफ करण्यासाठी करताना दिसतात.
भारतात अजूनही द्वितीय व तृतीय प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांवर जास्त भर दिला जातो. म्हणून जनमानसात मौखिक आरोग्यविषयक जनजागृती करणे अतिशय महत्वाचे आहे. याच कारणास्तव मौखिक स्वच्छता दिन देशभरातील विविध दंत महाविद्यालयांमध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. यादिवशी भारतीय दंत परिषद व इंडियन सोसायटी ऑफ पेरीओडोंटोलॉजी तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते तसेच सगळ्यात उत्तम कार्यक्रमाचे नियोजन करण्याऱ्या दंत महाविद्यालयाला पारितोषिक दिले जाते.
मागील वर्षापासून कोरोनाच्या महामारीने अवघ्या जगाला ग्रासलेले आहे. तसेच यावर्षी करोना झालेल्या रुग्णांमध्ये म्युकॉरमायकोसिस या रोगाची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून आली. या रोगाला वेळीच आळा घालण्यासाठी आपल्या मौखिक आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे.