पाचगणी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा, स्वच्छचा सर्वेक्षणात पटकावला महत्वाचा पुरस्कार
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-2021, आणि कचरामुक्त शहरे या सर्वेक्षणमध्ये सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी शहराला देशपातळीवरचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार सोहळा शनिवारी पार पडला. यापूर्वी पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर यांच्या नेतृत्वाखाली पाचगणी नगरपरिषद देशपातळीवर स्वच्छ सुंदर पाचगणी म्हणून गौरवण्यात […]
ADVERTISEMENT
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-2021, आणि कचरामुक्त शहरे या सर्वेक्षणमध्ये सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी शहराला देशपातळीवरचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार सोहळा शनिवारी पार पडला.
ADVERTISEMENT
यापूर्वी पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर यांच्या नेतृत्वाखाली पाचगणी नगरपरिषद देशपातळीवर स्वच्छ सुंदर पाचगणी म्हणून गौरवण्यात आले आहे 2021 या वर्षीदेखील लक्ष्मी ताई कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा गिरीस्थान थंड हवेचे ठिकाण पर्यटन स्थळ पाचगणीला देशपातळीवर गौरवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सातारा, मलकापूर, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर,कराड या ७ शहरांनादेखील कचरा मुक्त शहरे (GFC) चे ३ स्टार रँकिंग प्राप्त झाले असून यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे या शहरांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नगर परिषदांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
हे वाचलं का?
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पाचगणी शहरात घरगुती कचरा हा वेगळा केला जातो. ओला, सुका, घातक आणि प्लास्टिक तसेच घातक व सॅनिटरी कचरा, ई कचरा विलगीकृत घेतला जातो. कचरा विलागिकरणाचे प्रमाण हे 100 टक्के आहे. शहरातील नागरिक हे स्वत:ही घरचे घरी किचन वेस्ट पासून खत तयार करतात.
स्वच्छता अभियान : सांगली जिल्ह्यातल्या विटा आणि खानापूर नगरपालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
ADVERTISEMENT
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपरिषदेमार्फत घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेला ओला व सुका कचरा 100 टक्के संकलित केला जातो. प्लॅस्टीक बंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी करताना नागरिकांना पुर्नवापरयोग्य कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील जुन्या कचऱ्यावर 100 टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी नगरपालिकेने विविध मोहिम राबवल्या. कचरा डेपोमध्ये येणाऱ्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे पुनर्वापर करण्यात येते. नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. तसेच शासनाच्या ‘हरित ब्रॅण्ड’ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT