मुलीला कारमधून पळवलं; पंढरपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिकमध्ये केला बलात्कार
अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने विवाह करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीकांत कोताळकर या आरोपीवर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोताळकरसह त्याच्या आणखी एका साथीदाराला अटक करुन पंढरपूर शहर पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, २६ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास श्रीकांत कोताळकर या […]
ADVERTISEMENT
अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने विवाह करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीकांत कोताळकर या आरोपीवर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोताळकरसह त्याच्या आणखी एका साथीदाराला अटक करुन पंढरपूर शहर पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT
पीडितेच्या फिर्यादीनुसार, २६ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास श्रीकांत कोताळकर या पीडितेस कारमधून पळवून नेऊन दमदाटी व धमकी दिली . पंढरपूर , कोल्हापूर, मिरज , मोहोळ , औरंगाबाद , नाशिक , वेळापूर या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले . एप्रिल महिन्यात मोहोळ येथील एका मंदिरात नेऊन तिच्याबरोबर बळजबरीने विवाह केला. काही महिन्यांनंतर पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिचा गर्भपातही घडवून आणला.
Rape Case: 38 वर्षीय महिलेवर 24 वर्षीय तरुणाकडून बलात्कार, पुण्याहून परळीला आणून
महिलेवर अत्याचार
हे वाचलं का?
याप्रकरणी कोताळकर याला विशाल माणिक नेहतराव हा मदत करत होता , असे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी दोघांविरुद्ध पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . पंढरपूर उपविभागीय पोलिस अधीक्षक विक्रम कदम व पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांनी दोघांनाही अटक केली आहे . त्यांच्यावर 376 सह पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे . त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT