Balasaheb Thorat: वाद विकोपाला! थोरातांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा
Balasaheb Thorat Latest news: काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला सुप्त संघर्ष विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यावरून झालेला गोंधळ आणि त्यानंतर होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून वाद शिगेला गेला आहे. काँग्रेसमधील काही नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वावर नाराज असून, बाळासाहेब थोरातांनी थेट काँग्रेस नेतृत्वाकडे तक्रार केलीये. दरम्यान, बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ […]
ADVERTISEMENT

Balasaheb Thorat Latest news: काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला सुप्त संघर्ष विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यावरून झालेला गोंधळ आणि त्यानंतर होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून वाद शिगेला गेला आहे. काँग्रेसमधील काही नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वावर नाराज असून, बाळासाहेब थोरातांनी थेट काँग्रेस नेतृत्वाकडे तक्रार केलीये. दरम्यान, बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीये.
नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रं आल्यापासून पक्षातील धुसफूस सातत्यानं चर्चेत आहे. नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेकदा काँग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील नेत्यांचे नाना पटोलेंच्या नेतृत्वाबद्दलचे मतभेद जाहीरपण समोर आले.
सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपानंतर बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीला पत्र लिहिलं होतं. बाळासाहेब थोरातांनी या पत्रात नाना पटोले यांच्या नेतृत्वाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. आता बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
Nana Patole यांची स्वपक्षातूनच मोठी कोंडी? काँग्रेसमधील खदखद वाढली










