पैसे द्या नुकसानीची टक्केवारी वाढवतो, विमा कंपनी प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची लूट
गणेश जाधव, प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद , कळंब तालुक्यातील शेतकरी पार कोलमडून पडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्याने तो आर्थिक संकटात सापडला आहे. सर्वत्र अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पीक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची माहिती ७२ तासाच्या आत ऑनलाईन व ऑफलाईन देण्याचे बंधनकारक आहे. मात्र खराब […]
ADVERTISEMENT

गणेश जाधव, प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद , कळंब तालुक्यातील शेतकरी पार कोलमडून पडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्याने तो आर्थिक संकटात सापडला आहे. सर्वत्र अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पीक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची माहिती ७२ तासाच्या आत ऑनलाईन व ऑफलाईन देण्याचे बंधनकारक आहे. मात्र खराब वातावरणामुळे नेटवर्क नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन ऑफलाईन तक्रारी दिल्या.
या तक्रारीच्या अनुषंगाने उस्मानाबाद तालुक्यातील कारी शिवारात बजाज अलायन्झ पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने जाऊन पंचनामे केले. पंचनामा करताना त्या प्रतिनिधीने अनेक शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी केली. ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले अशा शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची टक्केवारी जास्ती प्रमाणात दाखविण्यात आली. तर ज्यांनी पैसे देण्यास असमर्थता दाखविली त्यांचे नुकसान झालेले असतानादेखील अगदी अल्प दाखविण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हे दाखल करण्यासह पुन्हा पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

