Petrol, Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमती जारी, पाहा काय आहेत आपल्या शहरातील दर
Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate 25 November: मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत गुरुवारीही दिलासा कायम आहे. आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या तीन आठवड्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये कायम आहे. काही दिवसांपूर्वीच […]
ADVERTISEMENT
Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate 25 November: मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत गुरुवारीही दिलासा कायम आहे. आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या तीन आठवड्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये कायम आहे.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती, त्यानंतर बहुतांश राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली होती.
दिल्लीशिवाय मुंबई, चेन्नई, कोलकाता या सर्व शहरांमध्ये तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत गुरुवारी पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.40 रुपये तर डिझेलची किंमत 91.43 रुपये आहे. त्याच वेळी, जर आपण पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताबद्दल बोललो, तर येथे पेट्रोलचे दर 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये आहेत.
हे वाचलं का?
काही राज्यातील पेट्रोलचे दर
-
मुंबई – 109.98
ADVERTISEMENT
दिल्ली – 103.97
ADVERTISEMENT
कोलकाता – 104.67
चेन्नई – 101.40
काही राज्यातील डिझेलचे दर
-
मुंबई – 94.14
-
दिल्ली – 86.67
-
कोलकाता – 89.79
-
चेन्नई – 91.43
कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढू लागले आहेत. त्याचबरोबर या वर्षी तेलाच्या किंमतीतही लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं. मात्र, दिवाळीच्या मुहूर्तावर जनतेला दिलासा देत मोदी सरकारने पेट्रोलवरील पाच रुपये आणि डिझेलवरील दहा रुपयांच्या अबकारी करात कपात केली होती.
त्यानंतर 20 हून अधिक राज्यांनी व्हॅट कमी केला होता. सुरुवातीला, एनडीएची सत्ता असलेल्या यूपी, त्रिपुरा, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांनी व्हॅट कमी केला होता. पण नंतर काँग्रेस शासित पंजाब, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला.
दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाशी संबंधित महत्त्वाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी भारताने आपल्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हमधून 5 दशलक्ष बॅरल कच्चे तेल बाजारात आणण्याची सहमती दर्शविली आहे.
Petrol-diesel Price Reduce: केंद्रानंतर ‘या’ 9 राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात केली कपात
अमेरिका, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या प्रमुख कच्च्या तेल ग्राहक देशांशी सल्लामसलत केल्यानंतर धोरणात्मक साठ्यातून कच्च्या तेल बाहेर काढले जाईल. हे सर्व देश जवळपास एकाच वेळी त्यांच्या साठ्यातून कच्चे तेल काढू शकतात. त्यामुले आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
परकीय चलन दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमतीवर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. तेल विपणन कंपन्या दररोज किंमतींचा आढावा घेऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात.
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींची माहिती अपडेट करत असतात.
तुम्ही तुमच्या शहरात दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत फक्त एका एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑईल (IOCL) च्या ग्राहकांना फक्त RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT