शेंगदाणे रंगवून चक्क बनवले पिस्ते, नागपूर अन्न औषध प्रशासनाची छापा मारत कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

ADVERTISEMENT

शेंगदाणे सुकवून आणि मग रंगवून त्याचे पिस्ते बनवण्याचा हा प्रकार अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा घालून उघडकीस आणला आहे. शेंगदाण्याला घातक रंगाने रंगवून, त्याची काप करून ती मिठायांमध्ये वापरण्याचा हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होता. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने छापा घातलेल्या इमारतीतून तब्बल ६२१ किलो रंगवलेला शेंगदाणा जप्त केला असून नागपुरातील कोणकोणते मिठाईवाले याचा वापर करत होते याचा तपास आता सुरु करण्यात आला आहे.

पिस्ता चाळणीत धुतला जातो आणि उन्हात सुकवला जातो आहे असं फोटो पाहिलं तर वाटतं. मात्र नीट निरखून पाहिल्यानंतर कळतं की हा पिस्ता नाही तर चक्क शेंगदाणा आहे. होय बरोबर आपल्या सगळ्यांच्या घरात असतो तोच शेंगदाणा. नागपुरात काही भेसळखोरांनी ९० रु किलोच्या सडक्या शेंगदाण्याला रंगवून, सुकवून त्याला पंधराशे रु किलोच्या पिस्त्यासारखा बनवण्याचा उद्योगच सुरु केला आहे.

हे वाचलं का?

नागपूरच्या बाबा रामसुमेर नगर परिसरातील एका इमारतीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जेव्हा पोहोचले… तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर शेंगदाण्याला घातक हिरव्या रंगात रंगवून पिस्त्यासारखे बनवण्याचे प्रकार उघडकीस आले. शेंगदाण्याला हिरव्या आणि लाल रंगात रंगवून, उन्हात अनेक दिवस सुकवून, चाळणी ने स्वच्छ करून पिस्ता किंवा बदाम सारखे बनवले जातं. त्यानंतर मशीनने त्याचे काप केले जातात. ९० रु किलोच्या शेंगदाण्याची कात्रण बाजारात पंधराशे ते सतराशे रु किलोने पिस्ता किंवा बदामाची काप मिठाई उत्पादकांना विकले जातात

ADVERTISEMENT

सोनपापडी, पेढा, बर्फी, लाडू सारख्या अनेक मिठायांवर पिस्ता किंवा बदाम या महागड्या सुकामेव्याची काप असतात. सजावटीसाठी तसेच चवीसाठी लावली जाते… मात्र, सुकामेवाचे दर बरेच जास्त असल्याने काही भेसळखोरांनी शेंगदाण्यातून पिस्ता आणि बदामसारख्या महागड्या सुकामेव्याच्या कात्रण तयार करणे सुरु केले. त्यांचे हे उद्योग अनेक महिने राजरोसपणे सुरु होते… मात्र, काही दक्ष नागरिकांनी त्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली… आणि सर्व प्रकार उघडकीस आला… अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या नियमांप्रमाणे ही शुद्ध भेसळ असून ग्राहकांची फसवणूक असल्याचंही म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT