मोदींना गाणं म्हणून दाखवणाऱ्या मुलाचे वडील कुणाल कामरावर का भडकले माहित आहे ?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच युरोपच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या वर्षातला हा पहिला परदेश दौरा होता.

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा बर्लिनला गेले होते तेव्हा तिथे त्यांचं जोरदार स्वागत झालं. तिथल्या मुलांमध्येही एक खास उत्साह पाहण्यास मिळाला. एका मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिच्या हाताने काढलेलं चित्र दाखवलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्या मुलीचं कौतुक केलं.

पंतप्रधान मोदी, योगींना लिहिलेल्या पत्रात मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने काय म्हटलंय?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याच दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका लहान मुलाचीही भेट घेतली. या मुलाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारताबाबत एक कविता ऐकवली. राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेली ही कविता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खूप भावली. या कवितेचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. मात्र याच व्हीडिओचं एक डॉक्टरेड व्हर्जनही समोर आलं. कॉमेडियन कुणाल कामराने ते शेअर केलं. त्यानंतर या मुलाचे वडील कुणाल कामरावर चांगलेच भडकले आहेत. या मुलाच्या वडिलांनी कुणाल कामरावर जोरदार टीका करत ट्विट केलं आहे.

कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार, दाखल केलं भन्नाट प्रतिज्ञापत्र

ADVERTISEMENT

कुणाल कामराने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत हा मुलगा बोलतो आहे हा व्हीडिओ शेअर केला त्यात हा मुलगा महंगाई डायन खाए जात है हे गाणं म्हणताना दिसतो आहे. दुसऱ्या एका व्हीडिओत वेलकम चित्रपटातला संवाद म्हणताना दिसतो आहे. या मुलाने हे जन्मभूमी भारत हे गाणं ओरिजनल व्हीडिओत गाताना दिसतो आहे. तर डॉक्टरेड व्हीडिओत त्याच्या तोंडी पीपली लाईव्ह च्या महंगाई डायन खात है हे गाणं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे या मुलाचे वडील कुणाल कामरावर चांगलेच चिडले आहेत.

ADVERTISEMENT

कुणाल कामराचा उल्लेख त्यांनी कचरा असा केला आहे. गणेश पोळ असं या मुलाच्या वडिलांचं नाव आहे. त्यांनी ट्विट करत कुणाल कामराला चांगलंच झापलं आहे. ते म्हणतात, “माझा मुलगा ७ वर्षांचा आहे. तो भारतमातेच्या प्रेमाखातर गाणं म्हणत होता. अजून तो खूप लहान आहे, मात्र तो भारतावर मिस्टर कामरा किंवा कचरा जे कोण आहेत त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम करतो. माझ्या मुलाला तुमच्या गलिच्छ राजकारणापासून बाजूला ठेवा. त्यापेक्षा तुमच्या सडक्या विनोदांवर थोडं काम करा” असं गणेश पोळ यांनी सुनावल्यानंतर कुणाल कामराने आपल्या अकाऊंटवरून ते डॉक्टरेड ट्विट डिलिट केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT