मोदी मला सरदार पटेलांपेक्षा मोठे नेते वाटू लागले आहेत-राऊत
गुजरामधल्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं. त्यावरून पंतप्रधानांवर होणारी टीका काही थांबताना दिसत नाही. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला आता सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षाही मोठे नेते वाटू लागले आहेत” असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला […]
ADVERTISEMENT

गुजरामधल्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं. त्यावरून पंतप्रधानांवर होणारी टीका काही थांबताना दिसत नाही. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला आता सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षाही मोठे नेते वाटू लागले आहेत” असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
“सरदार वल्लभभाई पटेल हे आमचे आदर्श आहेत. अलिकडच्या काळात भाजपचं त्यांच्यावरचं प्रेम वाढलं आहे. गुजरातमधील स्टेडियमला काय नाव द्यायचं हा त्यांच्या राज्य सरकारचा विषय आहे. तु्म्ही-आम्ही या विषयांमध्ये काय बोलू शकतो. स्टेडियमच्या नावाबाबतचा निर्णय क्रिकेट बोर्डाचीही असू शकतो. एखाद्या राजकीय पक्षाने काय करायला हवं आणिल काय नाही ते आम्ही ठरवू शकत नाही. त्यांना योग्य वाटलं असेल म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे नेते आहेत, मला आता ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.