PMO चा अधिकारी भासवलं अन् कश्मीर खोऱ्यात घेतली VIP ट्रिटमेंट… कोण आहे किरण पटेल?

मुंबई तक

PMO Fake Official Arrested : श्रीनगर : पंतप्रधान कार्यालयाचा (PMO) उच्चाधिकारी असल्याचं सांगून जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणेला दोनवेळा चकवा देणाऱ्या किरण पटेल (Kiran Patel) याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. किरण पटेल याच्यावर झेड-प्लस सुरक्षा, बुलेटप्रूफ एसयूव्ही आणि जम्मू-काश्मीरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये अधिकृत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. (PMO Fake Official: Kiran Patel was arrested […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

PMO Fake Official Arrested :

श्रीनगर : पंतप्रधान कार्यालयाचा (PMO) उच्चाधिकारी असल्याचं सांगून जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणेला दोनवेळा चकवा देणाऱ्या किरण पटेल (Kiran Patel) याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. किरण पटेल याच्यावर झेड-प्लस सुरक्षा, बुलेटप्रूफ एसयूव्ही आणि जम्मू-काश्मीरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये अधिकृत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. (PMO Fake Official: Kiran Patel was arrested by the authorities from a hotel in Srinagar)

किरण पटेल याने जम्मू-काश्मीरमधील उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आणि नियंत्रण रेषेजवळील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी दिल्याचा आरोप आहे. किरण पटेलला 3 मार्च रोजी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्याने स्वत:ची ओळख केंद्रात ‘अतिरिक्त सचिव’ म्हणून करून दिली होती आणि दावा केला की त्याला सरकारने दक्षिण काश्मीरमधील सफरचंदच्या बागांसाठी खरेदीदार ओळखण्याचे आदेश दिले होते.

कोण आहे किरण पटेल?

किरण पटेल गुजरातचा रहिवासी आहे. आरोपीचे व्हेरिफाइड ट्विटर अकाउंट आहे. त्याच्या ट्विटर प्रोफाइलनुसार, त्याने व्हर्जिनियामधील कॉमनवेल्थ विद्यापीठातून पीएचडी आणि आयआयएम त्रिचीमधून एमबीए केले आहे. आरोपीने ट्विटरवर विचारवंत, रणनीतीकार, विश्लेषक आणि प्रचार व्यवस्थापक असल्याचं सांगितलं आहे.

हे वाचलं का?