शिंदे विरुद्ध शिवसेनेत संघर्षाची ठिणगी! सदा सरवणकर यांच्यासह ८ जणांवर गुन्हा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गणपती विसर्जनाच्या मध्यरात्रीला प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि शिवसैनिक यांच्यात राडा झाला. या राड्यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप असून, आता या प्रकरणात सदा सरवणकर, त्यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्यासह ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्थदशीला मध्यरात्री प्रभादेवी रेल्वे जंक्शन परिसरात शिंदे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. हा राडा झाला तेव्हा आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेने केला.

शिंदे गटातील संतोष तेलवणे आणि शिवसेनेचे शाखाप्रमुख महेश सावंत यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रभादेवी जंक्शन परिसरात स्टॉल लावला होता. त्यावरूनच वादाची ठिणगी पडली आणि राडा झाला. महेश सावंत यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप संतोष तेलवणे यांनी केला होता. तर आता याच प्रकरणात सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचं आरोप करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

प्रभादेवी राडा : ठाकरे गटाच्या २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल; महेश सावंतांसह ५ जणांना अटक

गणेश विसर्जनाच्या रात्री झालेल्या या प्रकरणानंतर शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी दादर पोलिसांकडे सदा सरवणकर यांच्याविरुद्ध गोळीबार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

ADVERTISEMENT

आमदार सदा सरवणकरांनी खरचं गोळीबार केला का? सखोल चौकशी होणार…

ADVERTISEMENT

सदा सरवणकर यांच्याविरुद्ध कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल?

मुंबई पोलिसांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर, त्यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्यासह ७ ते ८ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोलिसांनी गोळीबार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

सदा सरवणकर, समाधान सरवणकर यांच्यासह ७ ते ८ जणांविरुद्ध आर्म्स अॅक्टमधील ३/२५, १४२, १४३, १४४, १४६, १८६, ३३६ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा ३७ (१) या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT