पुढाऱ्यांनी उभारली थाटात गुढी, शेअर केले फोटो

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आज संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील नेतेमंडळींनीही गुढीपाडव्याचा सण आपल्या परिवारासोबत थाटामाटात साजरा केला आहे.

ADVERTISEMENT

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी सपत्नीक गुढीपाडवा साजरा केला.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या निवासस्थळी गुढीपाडवा साजरा केला.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही साज श्रृगांर करत गुढी उभारली.

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या निवासस्थानी म्हणजेच बीडमध्ये सर्वांच्या उपस्थितीत गुढी उभारत पूजा केली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आपला फोटो पोस्ट केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही सपत्नीक आणि मुलांसह गुढी उभारत आनंद साजरा केला.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT