Prashant Kishor आज शरद पवारांची भेट घेणार, कारण गुलदस्त्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार आहेत. आज सकाळी ११ वाजल्याच्या दरम्यान प्रशांत किशोर शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत. या भेटीमागचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेली भेट आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदीन कार्यक्रमात शरद पवारांनी भविष्यकाळात महाविकास आघाडीबद्दल केलेलं वक्तव्य या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्या आजच्या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे. शिवसेनेसोबत आपण कधी सरकार बनवू असं वाटलं नव्हतं, शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे असं वक्तव्य पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदीन कार्यक्रमात केलं होतं.

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावल्यानंतर प्रशांत किशोर पहिल्यांदा चर्चेत आले. यानंतर किशोर यांनी पंजाब आणि बिहारमध्येही स्ट्रॅटजिस्ट म्हणून काम केलं होतं. यानंतर ममता बॅनर्जींच्या विजयातही किशोर यांनी मोलाची भूमिका बजावली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातली भेट ही महत्वपूर्ण मानली जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT