पुणे: वडील-भावाकडून 11 वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार, तर आजोबा आणि मामाकडून विनयभंग
पुणे: पुण्यातील विविध शाळा, महाविद्यालमध्ये ‘गुड टच अॅन्ड बॅड टच’ संदर्भात लेक्चर घेण्यात येत आहेत. त्यातून अनेक धक्कादायक घटना या समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. पुण्यातील ताडीवाला रोड येथील एका 11 वर्षीय मुलीने तिच्यावर तब्बल 6 वर्षापासून वडील आणि भाऊ बलात्कार असल्याची अत्यंत घृणास्पद घटना आता […]
ADVERTISEMENT

पुणे: पुण्यातील विविध शाळा, महाविद्यालमध्ये ‘गुड टच अॅन्ड बॅड टच’ संदर्भात लेक्चर घेण्यात येत आहेत. त्यातून अनेक धक्कादायक घटना या समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे.
पुण्यातील ताडीवाला रोड येथील एका 11 वर्षीय मुलीने तिच्यावर तब्बल 6 वर्षापासून वडील आणि भाऊ बलात्कार असल्याची अत्यंत घृणास्पद घटना आता समोर आली आहे. एवढंच नव्हे तर पीडित मुलीचे आजोबा आणि तिचा चुलत मामा यांच्या अत्याचाराला देखील तिला सामोरे जावे लागत असल्याचे आता उघड झाले आहे.
पीडित मुलीवर वडील आणि भाऊ हे सातत्याने बलात्कार करत होते. तर आजोबा आणि चुलत मामा हे वारंवार मुलीचा विनयभंग करत असल्याचा आरोप आता पीडित मुलीने केला आहे. या सगळ्या प्रकरणी आता बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या गुन्हे निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध शाळा, महाविद्यालयमध्ये ‘गुड टच अॅन्ड बॅड टच’बद्दल मुलींना माहिती दिली जात आहे.