MHADA Exam Cancel : पेपर फुटीप्रकरणी तिघांना अटक, पुणे सायबर पोलिसांची कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात आज विविध पदांसाठी होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेसाठी हजारो युवक मुंबईत आले आहेत. परंतू मध्यरात्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आज होणारी परीक्षा रद्द झाल्याचं जाहीर केलं. तांत्रिक कारणामुळे ही परीक्षा रद्द झाल्याचं आव्हाडांनी सांगितल्यानंतर परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला. दरम्यान पुणे पोलिसांनी पेपर फुटी प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे.

पुणे सायबर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री एका सायबर कंपनीचा संचालक आणि दोन एंजटना अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी पेपर फोडण्याच्या तयारीत होते. पुण्यात रात्री हे तिन्ही आरोपी एका गाडीतून पेपर फोडण्याच्या उद्देशाने फिरत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून दुपारी तीन वाजता पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना म्हाडा परीक्षा पास करण्यासाठी काही दलालांनी पैसे घेतल्याचं कळालं होतं. दलालांनी ताबडतोक मुलांचे पैसे परत करावेत असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला होता. याचवेळी म्हाडा परीक्षेचा पेपर फोडला जाणार असल्याची कुणकुण लागली होती. याचदरम्यान पुणे पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आव्हाडांचं मध्यरात्री ट्विट, म्हाडाची होणारी परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांमध्ये संताप

दरम्यान मध्यरात्री अचानक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यामुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक उमेदवार हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मुंबईला परीक्षेसाठी आले होते. परंतू केंद्रावर पोहचताच त्यांना परीक्षा रद्द झाल्याचं कळालं. एकीकडे एसटी संप चालू असताना पदरचे जास्त पैसे खर्च करुन उमेदवार परीक्षेला आले होते. त्यामुळे सरकारने सर्व उमेदवारांना आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी अनेकांनी केली आहे. दरम्यान आज रद्द झालेली परीक्षा ही जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT