पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रवर पडलेल्या दरोड्याचा यशस्वी तपास, पाच दरोडेखोर अटकेत
२१ ऑक्टोबरला पुणे जिल्ह्यातील शिरुर भागात पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर पडलेल्या दरोड्याचा यशस्वी तपास करण्यात पोलिसांना यश आलंय. या दरोड्यात सहभागी झालेल्या पाचही आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. बंदूकीच्या धाकावर दरोडेखोरांनी त्यावेळी बँकेत उपस्थित ग्राहक आणि कर्मचाऱ्यांकडून २ कोटी ८० लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल […]
ADVERTISEMENT
२१ ऑक्टोबरला पुणे जिल्ह्यातील शिरुर भागात पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर पडलेल्या दरोड्याचा यशस्वी तपास करण्यात पोलिसांना यश आलंय. या दरोड्यात सहभागी झालेल्या पाचही आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. बंदूकीच्या धाकावर दरोडेखोरांनी त्यावेळी बँकेत उपस्थित ग्राहक आणि कर्मचाऱ्यांकडून २ कोटी ८० लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता.
ADVERTISEMENT
पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपासाकरता १० पथकं स्थापन केली होती. यादरम्यान पुणे पोलिसांना दरोडा टाकणारे आरोपी हे मध्य प्रदेशच्या दिशेने गेल्याचं कळलं. यानंतर १० पथकांपैकी काही पथकं ही मध्य प्रदेशात तपासाकरता गेली. यानंतर पुणे पोलिसांना आणखी एक माहिती मिळाली ज्यात दरोडेखोरांपैकी एक जण अहमदनगरच्या निघोज भागात येणार असल्याचं कळलं.
डोंबिवली : अमेरिकन डॉलर्सचं अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक
हे वाचलं का?
यानंतर पुणे पोलिसांनी सापळा रचत निघोज गावाजवळ आरोपी येताच त्याला पकडलं. यानंतर तपासादरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल करत एका शेतात दागिने आणि रक्कम लपवल्याचं सांगितलं. पुणे पोलिसांनी हा मुद्देमाल आपल्या ताब्यात घेतला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गेल्या तीन महिन्यांपासून या दरोड्याची योजना आखली होती. पाच आरोपींपैकी एक आणि टोळीचा म्होरक्या प्रवीणने यासाठी मध्यप्रदेशात जाऊन ३ रिव्हॉल्वर मिळवल्या. या दरोड्यात आरोपींनी २ चारचाकी गाड्यांचाही वापर केला. दरोडा टाकल्यानंतर त्यांनी गाडी मध्य प्रदेशात नेऊन गाडीचा रंग बदलून ग्रे वरुन पांढरा केला.
ADVERTISEMENT
बीड : परळी तालुक्यात गांजाची शेती करणाऱ्या तीन जणांना अटक
ADVERTISEMENT
पोलिसांना आपला सुगावा लागू नये यासाठी आरोपींनी दरोड्यावेळी वापरलेले आपले कपडेही जाळून टाकले. परंतू कायद्याचे हात लांब असतात ही बाब आरोपी विसरले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी या कारवाईत १८ लाखांची रोख रक्कम हस्तगत केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT