मुंबईचा वेग पावसामुळे मंदावला, अनेक भागांत पाणी; रत्नागिरीत काजळीला पूर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राजधानी मुंबईमध्ये (Mumbai Rain) आणि आजूबाजूच्या परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु होता. सकाळी काही काळ पासवाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. लोकलची वाहतूक सध्या सर्व मार्गांवर सुरळीत आहे.

ADVERTISEMENT

आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या अजून अनेक भागात पाऊस पोहोचलेला नाही, तर काही भागात कमी स्वरुपाचा पाऊस पडला आहे. दरम्यान मुंबईत पुढील ४ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ७ आणि ८ जुलैला मुंबईच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे या जिल्ह्यांना हवामान खात्याच्या वतीनं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभरातली परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आव्हान हवामान खात्याच्या वतीनं करण्यात आलं आहे. पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागात अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे वाचलं का?

कोल्हापुरात एनडीआरएफ दाखल

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी ३० फूट ८ इंच इतकी आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट ३ इंच व धोका पातळी – ४३ फूट आहे. एनडीआरएफ काल रात्री साडेनऊच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यात दोन पथकं पोहोचली असून त्यातील एक पथक हे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यात तर दुसरे पथक कोल्हापूर शहरात कार्यरत संभाव्य पूर परिस्थिती निर्माण झाली तर यावर लक्ष ठेवून राहणार आहे. कोल्हापुरातील एनडीआरएफ पथकानं शहरालगतच्या असणाऱ्या पंचगंगा नदी शिवाजी पूल, या ठिकाणी येऊन पाहणी देखील केली आहे.

ADVERTISEMENT

पावसामुळे राजापूर शहराला सलग दुसऱ्या दिवशी पुराचा वेढा

ADVERTISEMENT

राजापूर शहराला पुन्हा एकदा सलग दुसर्‍या दिवशी पूराचा वेढा पडला आहे. मुसळधार पावसामुळे अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पूरामुळे राजापूर शहरातील शिवाजीपथ रस्त्यासह वरचीपेठ, मुन्शी नाका परिसर पाण्याखाली गेला असून जवाहर चौकामध्ये सुमारे दिड-दोनफुट उंच पाणी वाढलेले होते. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने शहराभोवतीचा पूराचा वेढा सायंकाळी उशीरापर्यंत कायम राहीलेला होता. या पूरस्थितीमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल रोडावली आहे.

पालघरमध्ये NDRF ची टीम दाखल

पालघरमध्ये रात्री 12 वाजता NDRF ची टीम दाखल आहे. जिल्हा प्रशाशनाकडून NDRF ची टीम जिल्ह्यात मागवण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासन अलर्टवर आले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT