Rajasthan Assembly Election Results 2023: राजस्थानमध्ये काँग्रेसला धोबीपछाड.. गेहलोत म्हणाले, ‘हा सर्वांसाठी अनपेक्षित निकाल’
Rajasthan Assembly Elections Results Live: आज राजस्थानसह 4 राज्यांमध्ये मतमोजणी सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. येथे सुरुवातीच्या कलापासून भाजप आणि काँग्रसेमध्ये प्रचंड काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. येथील लढाई ही अगदी जवळची आहे. त्यामुळे येथे नेमकी सत्ता कोण मिळवणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे. (rajasthan assembly elections 2023 live updates live election results 2023 wining candidates list)
एक्झिट पोलमध्ये राजस्थानमध्ये कोणाला मिळालेलं बहुमत?
एक्झिट पोलनुसार,भाजपला 80 ते100 जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला 80-106 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अपक्ष 9-18 जागांवर येण्याची शक्यता आहे. जर निकाल अशाच प्रकारचे आले तर राजस्थानमध्ये घोडेबाजार अधिक तेजीत येऊ शकतो. तसेच अपक्षांना देखील प्रचंड महत्त्व प्राप्त होऊ शकतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 04:49 PM • 03 Dec 2023
हा सर्वांसाठी अनपेक्षित निकाल : अशोक गेहलोत
राजस्थानमधील पराभवानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, 'जनतेचा हा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. हा प्रत्येकासाठी अनपेक्षित निकाल आहे. आमच्या योजना, कायदे आणि नवकल्पना लोकांपर्यंत नेण्यात आम्ही पूर्णपणे यशस्वी झालो नाही, हे या पराभवावरून दिसून येते. नवीन सरकारला माझ्या शुभेच्छा. माझा त्यांना सल्ला आहे की खूप मेहनत करूनही आम्ही यशस्वी झालो नाही. याचा अर्थ त्यांनी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर काम करू नये, असा नाही. ओपीएस, चिरंजीवीसह अनेक योजना आम्ही राजस्थानला गेल्या पाच वर्षांत दिल्या, त्या पुढे न्याव्यात. या निवडणुकीत परिश्रम घेतलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो आणि ज्या मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे मी आभार मानतो.' - 03:44 PM • 03 Dec 2023
राजस्थानमध्ये भाजपचा विजय निश्चित
राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळेल असा अंदाज अनेक एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला होता. पण याच्या अगदी उलट निकाल पाहायला मिळत आहे. सध्या राजस्थानमध्ये भाजप 117 जागांवर आघीडीवर आहे. तर काँग्रेस फक्त 67 जागांवरच आघाडी घेऊ शकला आहे. - 12:07 PM • 03 Dec 2023
राजस्थानमध्ये काँग्रेसची प्रचंड पीछेहाट
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत 15360 मतांनी आघाडीवर, मात्र काँग्रेसची प्रचंड पीछेहाट, भाजपने पुन्हा खेचून आणला गड - 11:48 AM • 03 Dec 2023
राजस्थानमध्ये भाजपने केली कमाल, गेहलोत यांना मोठा धक्का
राजस्थानमध्ये प्रथम पिछाडीवर असलेल्या भाजपने काँग्रेसला मागे ढकललं आहे. सध्या इथे भाजप 116 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस फक्त 64 जागांवर आघाडीवर आहे. - 11:06 AM • 03 Dec 2023
राजस्थानमध्ये भाजपचं जोरदार कमबॅक
सुरुवातीला काहीशी पिछाडीवर असलेल्या राजस्थानमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला बॅकफूटवर ढकललं आहे. - 09:52 AM • 03 Dec 2023
राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच
सध्या राजस्थानमध्ये भाजप 97 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस 85 जागांवर आघाडीवर. - 09:41 AM • 03 Dec 2023
राजस्थानमध्ये भाजपची जबरदस्त मुसंडी
राजस्थानमध्ये सुरुवातीला काँग्रेस भाजपला टक्कर देत होती. पण आता मात्र, भाजपने चांगली पकड घेतली आहेत. सध्या भाजप 101 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 80 जागांवर आघाडीवर आहे. - 09:18 AM • 03 Dec 2023
राजस्थानमध्ये कोणाला मिळणार बहुमत?
प्राथमिक कलानुसार भाजप 97 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 92 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे इथे कोणाला सत्ता मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. - 09:15 AM • 03 Dec 2023
राजस्थान विधानसभा मतमोजणी प्रचंड रंजक
1993 सालापासून राजस्थान कोणत्याही पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवता आलेली नाही. अशातच सध्या सुरू असलेल्या मतमोजणीत भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. - 09:03 AM • 03 Dec 2023
राजस्थानमध्ये कोण मारणार बाजी?
राजस्थानमध्ये मतमोजणीला थोड्याच वेळापूर्वी सुरुवात झाली असून सध्या पोस्टल बॅलेट मतमोजणी सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT