शेतकऱ्याच्या पोराची कमाल ! बुलढाण्याचा राजू केंद्रे झळकला फोर्ब्सच्या यादीत
– ज़का खान, बुलढाणा प्रतिनिधी जगभरात विविध विषयांमध्ये चांगली आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांच्या कामाची दखल फोर्ब्स मासिकात घेतली जाते. आपली वेगळी वाट शोधून काहीतरी वेगळं करणाऱ्या प्रत्येकाची इच्छा असते की आपलं नाव हे एकदातरी फोर्ब्सच्या मासिकात यावं. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबातील मुलाची ही इच्छा पूर्ण झाली आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय […]
ADVERTISEMENT
– ज़का खान, बुलढाणा प्रतिनिधी
ADVERTISEMENT
जगभरात विविध विषयांमध्ये चांगली आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांच्या कामाची दखल फोर्ब्स मासिकात घेतली जाते. आपली वेगळी वाट शोधून काहीतरी वेगळं करणाऱ्या प्रत्येकाची इच्छा असते की आपलं नाव हे एकदातरी फोर्ब्सच्या मासिकात यावं. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबातील मुलाची ही इच्छा पूर्ण झाली आहे.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल फोर्ब्स मासिकानं बुलढाण्यातील राजू केंद्रेची दखल घेतली असून २०२२ च्या ‘Forbes 30 Under 30’ यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राजूने केलेल्या कामगिरीबाबत एक स्टोरी प्रकाशित केली आहे. ‘फोर्ब्स’ इंडिया फेब्रुवारीच्या अंकात सविस्तर यादी आणि त्याची स्टोरी पब्लिश झाली आहे. ही यादी आता ऑनलाईनही उपलब्ध होणार आहे.
हे वाचलं का?
कोण आहे राजू केंद्रे आणि कसा राहिला आहे त्याचा आतापर्यंतचा प्रवास?
राजू विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री-खंदारे या छोटयाश्या खेड्यातील भटक्या समाजाचा विद्यार्थी आहे. राजुच्या आई वडिलांचे प्राथमिक शिक्षणही झालेलं नाही. राजूच्या माध्यमातून केंद्रे कुटुंबातील पहिलीच पिढी उच्च शिक्षण घेणारी ठरली आहे. राजूने शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. पुढे कलेक्टर व्हावं म्हणून पदवीच्या शिक्षणासाठी तो पुण्याला गेला, परंतू कुणी मार्गदर्शक नसल्याने खूप चकरा मारूनही हॉस्टेल राजूला मिळालं नाही. ज्यामुळे त्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेता आला नाही. यानंतर राजूने BPO मध्ये काम करायचा प्रयत्न केला पण तिथेही वैदर्भीय भाषेचा टिकाव लागला नाही. अवघ्या काही महिन्यात राजूला पुणे सोडावं लागलं.
ADVERTISEMENT
शेतीसाठी होणार होमिओपॅथी औषधांचा वापर, बारामती कृषी विज्ञान केंद्रात अनोखा प्रयोग
ADVERTISEMENT
आजही क्षमता असतानाही अशा प्रकारची व्यवस्था व परिस्थितीसमोर मुकणारी अशी भरपूर विद्यार्थी आपल्या आजूबाजूला तांड्यात, झोपडपट्टीत, वाड्यात, पाड्यात आपल्याला दिसत असतात. म्हणूनच त्यावर काम करण्यासाठी अवघ्या विशीतल्या राजूने संघर्षाचं प्रतीक असणारं ‘एकलव्य’ नावाचं एक व्यासपीठ तयार केलं. पुढच्या पिढीच्या उच्चशिक्षण मार्गातील अडचणी कमी व्हाव्यात आणि जागतिक दर्जाचं शिक्षण मिळावं हा त्यापाठीमागचा उद्देश होता.
मेळघाटातून कामाला सुरुवात –
२०१२ ला मुक्त विद्यापीठात शिकत असताना राजुला मेळघाट या आदिवासी भागात जाण्याची संधी मिळाली. मेळघाटात मित्रच्या गटासोबत दोन वर्ष पूर्णवेळ काम त्याने केले. राजू कलेक्टर होऊन भविष्यात सामाजिक बदल घडवून आणण्याचे स्वप्न पाहत असताना तो आदिवासी भागातील त्यावेळेसचे प्रश्न आणि अडचणी पाहून अस्वस्थ व्हायचा. त्यामुळे शेवटी आजचे प्रश्न समजून घेऊन आधी त्यावर उत्तर शोधायचं राजूने ठरवलं आणि अधिकारी होण्याचं स्वप्न सोडून दिलं.
निवृत्त लष्करी अधिकाऱ्यासाठी स्विगी बॉय ठरला देवदूत, ट्रॅफिकमध्ये दुचाकीवरुन पोहचवलं रुग्णालयात
टाटा इनस्टिट्युटमधून ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेताना त्याने ग्रामपरिवर्तन चळवळीद्वारे स्वतःच्या गावातच काम करायचे ठरवले. त्याद्वारे त्याला थेअरीचे ज्ञान प्रत्यक्षात आणायचं होते. २०१५ मध्ये त्याने ग्रामपंचायत निवडणूक लढवायचे ठरवले. आपल्या गावाचा जाहीरनामा स्टॅम्प पेपरवर बनवला आणि तो गावकऱ्यांना दिला. परंतू प्रस्थापित राजकीय समाजाने त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला. बरेच अडथळे होते पण त्यातूनही तो शिकत होता. राजूने महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण विकास फेलोशिप मध्येही म्हणून काम केलं. त्या काळात त्याने पारधी समाजासाठी विकासकामे केली. त्याच्या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली.
राजू केंद्रे हा ‘एकलव्य इंडिया’ याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन करतो. स्वत: सारख्या पहिल्या पिढीतील शिकणाऱ्यांना तळागाळातील विद्यार्थ्यांचं नेतृत्व सक्षम करण्याचं काम तो करतो. तो सध्या चेवनिंग स्कॉलरशिपवर SOAS- युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीज शिकत आहे. याठिकाणी तो ‘भारतातील उच्च शिक्षण आणि असमानता’ या विषयावर संशोधन करत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT