Rajya Sabha Election: सहाव्या जागेसाठी सत्ताधारी-विरोधकांमध्ये चढाओढ, काय आहे जागेचं गणित?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

१० जून रोजी राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. सध्याच्या विधानसभेत सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं संख्याबळ पाहता त्यांचा १-१ खासदार निवडून येईल. विरोधी पक्षातील भाजपचं संख्याबळ पाहता त्यांचेही दोन खासदार निवडून येण्याची चिन्ह आहेत.

ADVERTISEMENT

उरलेल्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. आपल्या उमेदवारीसाठी संभाजीराजेंनी सर्वपक्षीय आमदारांना आपल्याला पाठींबा देण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे शिवसेनेनेही सहावी जागा लढवण्याचे सुतोवाच केल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चुरस रंगलेली पहायला मिळतेय.

शिवसेनेने सहावी जागा लढवण्याचे संकेत दिल्यामुळे आकड्यांचं गणित कसं जुळवलं जातंय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. जाणून घेऊयात सध्याच्या विधानसभेत असलेलं पक्षीय बलाबल नेमकं काय आहे.

हे वाचलं का?

महाविकास आघाडी – १६९ आमदार (शिवसेना ५५ + राष्ट्रवादी ५३ + काँग्रेस ४४ + इतर पक्ष ८ + अपक्ष ८)

भाजप – ११३ आमदार (भाजप १०६ + रासप-जनसुराज्य प्रत्येकी १-१ + अपक्ष ५)

ADVERTISEMENT

* शिवसेनेच्या विधानसभेत ५६ जागा आहेत, परंतू आमदार लटके यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त आहे.

ADVERTISEMENT

राज्यसभेत खासदार निवडून येण्यासाठी एक निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील एकूण विधानसभा सदस्यांची संख्या भागिले (÷) राज्यसभेच्या रिक्त जागा + १ या सूत्रानुसार खासदार निवडून येतात. ज्यामुळे प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी ४२ मतांची गरज लागणार आहे.

Rajya Sabha Election : आकडे आणि मोड दोन्ही आमच्याकडेच ! सहाव्या जागेवर शिवसेनेची दावेदारी

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या संकेताप्रमाणे सहावी जागा लढवण्यासाठी लागणारी आकडेमोड महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे सहाव्या जागेवर शिवसेना आपली जागा निवडून आणणार आहे. परंतू तिन्ही पक्षांचा एक-एक उमेदवार निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीकडे २६ मतं उरतात त्यामुळे उरलेल्या मतांसाठी त्यांना अपक्षांची मनधरणी करावी लागणार आहे. अपक्षांनी साथ दिल्यास सहावी जागा महाविकास आघाडी सहज निवडून आणू शकते.

दुसरीकडे भाजपही या सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवेल असं दिसंतय. केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपला राज्यसभेत आपलं बहुमत अबाधित राखायचं आहे. त्यामुळे दोन जागा निवडून आल्यानंतर भाजपकडे २२ मत शिल्लक राहतात आणि त्यांना इतर पक्ष आणि अपक्ष मिळून ७ आमदारांचा पाठींबा आहे. ज्यामुळे भाजपकडे सहाव्या जागेसाठी २९ मत तयार असून त्यांना उर्वरित १३ मतांसाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे.

त्यामुळे या सहाव्या जागेसाठीची जुळवाजुळव कोण करतं आणि संभाजीराजेंच्या उमेदवारीबद्दल नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं येणाऱ्या काळात महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT