Nude Photo Shoot : रणवीर सिंग विरोधात FIR दाखल, तुरुंगात जावं लागणार?

मुंबई तक

Ranveer Sing Nude Photo Shoot : अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आहे. अशातच या फोटोशूट प्रकरणी मुंबईत रणवीर सिंगच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतल्या चेंबूर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी FIR नोंदवून घेतला आहे. त्यामुळे अभिनेता रणवीर सिंगला तुरुंगवास भोगावा लागू शकतो अशी चर्चा आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Ranveer Sing Nude Photo Shoot : अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आहे. अशातच या फोटोशूट प्रकरणी मुंबईत रणवीर सिंगच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतल्या चेंबूर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी FIR नोंदवून घेतला आहे. त्यामुळे अभिनेता रणवीर सिंगला तुरुंगवास भोगावा लागू शकतो अशी चर्चा आहे.

रणवीर सिंगच्या विरोधात कुठल्या कलमांन्वये एफआयआर?

रणवीर सिंगच्या विरोधात कलम २९२, २९३, ५०९ तसंच आयटी अॅक्ट च्या कलम ६७ ए अन्वये केस दाखल करण्यात आली आहे. ज्या कलमांच्या अंतर्गत रणवीर सिंगच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचा विचार केला तर रणवीर सिंगला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. रणवीरच्या विरोधात आयटी अॅक्ट ६७ ए अन्वये गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणात जामीनही मिळत नाही. महिलांचा अपमान करणं आणि त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहचवणं यासाठीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयपीसीचं कलम २९२ च्या अंतर्गत अश्लीलतेचा वापर करण्यात आला आहे. कुठलाही पेपर, पॅम्पलेट किंवा पुस्तकात, मॅगझिन, लेख, ड्रॉईंग यातून अश्लील साहित्य, फोटो, मजकूर प्रचारीत केला गेला तो पाहून, वाचून लोकांचा भावना भ्रष्ट झाल्या तर गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात दोषी असल्यास २ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

कलम २९३ च्या अन्वये २० वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीने अश्लील साम्रुगी विकली किंवा प्रदर्शित केली किंवा तसा प्रयत्न केला तर शिक्षा होते. पहिल्यांदा या प्रकरणात दोषी आढळल्यास तीन वर्षे शिक्षा आणि दोन हजार रूपये दंड अशी तरतूद आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp