Shocking! साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून बलात्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात 9 वीमध्ये शिकत असणाऱ्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. हे कृत्य तिच्याच वर्गात शिकत असणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी केलं आहे. याप्रकरणी या दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

14 वर्षाची मुलगी गरोदर असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे तिच्या पोटात सात महिन्याचे गर्भ असल्याचेही धक्कादायक माहिती समोर आली आहे यासंदर्भात मेढा पोलीस स्थानकात 14 वर्षाच्या पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केली असून दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना बाल सुधारगृह तथा रिमांड होम सातारा येथे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जावळी तालुक्यातील 14 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलगी शेतात तिच्या कुटुंबीयांसह राहत होती तिच्याच वर्गातील असणारे दोन मुलं शेतातच या अल्पवयीन मुलीच्या घरी आले. या मुलीच्या घरात कोणी नसताना पाहून चाकूचा धाक दाखवत तिच्यावर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला व याचे मोबाईलवर चित्रीकरण देखील केले.मोबाईलवर केलेल्या चित्रीकरणाच्या आधारे व शेतातल्या घरात कोणीही नसताना याचा कायमस्वरूपी फायदा घेत एक महिना सातत्यानं दोन्ही अल्पवयीन मुलांनी वारंवार बलात्कार केला असल्याची तक्रार देखील अल्पवयीन मुलीने आपल्या फिर्यादीत दिली आहे.

हे वाचलं का?

या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या पोटात सात महिन्याचा गर्भ असल्याची खळबळजनक माहिती समोर आली. याबाबत संबंधित अल्पवयीन मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर फिर्यादी व कुटुंबीयांनी पोलिसांना ही बाब निदर्शनास आणली. त्यानंतर तिच्याच वर्गात शिकत असणाऱ्या दोन मुलांच्या विरोधात सगळा प्रकार पीडितेने सांगितला. पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यावर असता संबंधित दोन अल्पवयीन मुले दोषी आढळले व त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं आहे. सातारा येथील रिमांड होममध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे. यासंदर्भात मेढा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, इमरान मेटकरी, पद्मश्री घोरपडे आणि रफिक शेख करत आहेत

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT