मुंबईत खासगी रुग्णालयांसाठी Covid 19 Vaccines चे दर निश्चित
कोव्हिड-19 प्रतिबंधक लसीकरण राष्ट्रीय मोहीम अंतर्गत, अधिकाधिक नागरिकांना लस देता यावी यासाठी खासगी रुग्णालयांना सशुल्क लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी लस उत्पादकांनी ठरवलेले उत्पादन दर आणि त्यावर लागू होणारे कर हे सर्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोविड लसींचे कमाल दर निर्धारित केले आहेत. या दरांनुसारच खासगी रुग्णालयांनी आकारणी करावयाची असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई […]
ADVERTISEMENT
कोव्हिड-19 प्रतिबंधक लसीकरण राष्ट्रीय मोहीम अंतर्गत, अधिकाधिक नागरिकांना लस देता यावी यासाठी खासगी रुग्णालयांना सशुल्क लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी लस उत्पादकांनी ठरवलेले उत्पादन दर आणि त्यावर लागू होणारे कर हे सर्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोविड लसींचे कमाल दर निर्धारित केले आहेत. या दरांनुसारच खासगी रुग्णालयांनी आकारणी करावयाची असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबतची तक्रार नोंदविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने complaint.epimumbai@gmail.com हा इ-मेल आयडी उपलब्ध करुन दिला आहे.
ADVERTISEMENT
Vaccination for Children: कोरोनाची तिसरी लाट आणि मुलांसाठी लस… जाणून घ्या याविषयी
राष्ट्रीय कोव्हिड-19 लसीकरण कार्यक्रम हा दिनांक 16 जानेवारी 2021 पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात टप्प्या-टप्प्याने राबविण्यात येत आहे. मुंबईतील शासकीय तसेच महानगरपालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शासकीय तसेच महानगरपालिका केंद्रात विनामूल्य लसीकरण केले जात आहे तर खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लस देण्यात येत आहे.
हे वाचलं का?
केंद्र शासनाच्या मुक्त धोरणानुसार खासगी लसीकरण केंद्र लस उत्पादकाकडून लस खरेदी करून नागरिकांचे सशुल्क लसीकरण करू शकतात. यासंदर्भात दिनांक 8 जून 2021 रोजी केंद्र सरकारने खासगी लसीकरण केंद्राने लाभार्थ्याकडून आकारण्याचे दर निश्चित केले आहेत. या अनुषंगाने लस उत्पादकाने दिलेला दर तसेच अधिक 5 टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि जास्तीत जास्त 150 रुपये सेवाशुल्क खासगी लसीकरण केंद्र लाभार्थ्याकडून घेऊ शकतात.
थेट लसीकरण केंद्रावर जाऊन घेता येणार लस, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय
ADVERTISEMENT
असे असतील दर
ADVERTISEMENT
कोव्हिशिल्डः 600+30+150=780 रुपये
कोव्हॅक्सिनः 1200+60+150=1410 रुपये
स्पुटनिक-व्हीः 948+47+150=1145 रुपये
सरकारने निश्चित केलेल्या या दरांमध्ये बदल झाल्यास वेळोवेळी नागरिकांना कळविण्यात येईल.
यास्तव खासगी लसीकरण केंद्रांना कळविण्यात येते की, वर नमूद केलेल्या दरानुसारच लाभार्थ्यांकडून लसीकरण शुल्क आकारण्यात यावे. अवाजवी शुल्क आकारण्यात आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी.नागरिक, गृहसंकुल पदाधिकारी तसेच औद्योगिक संस्था प्रमुखांनी सदर लस दर निश्चितीची नोंद घ्यावी. अवाजवी दर आकारण्यासंदर्भातील तक्रार complaint.epimumbai@gmail.com या ई-मेलवर नोंदविण्यात यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT