दोन महिने चालणार IPL चा थरार; जिओने निवडक यूजर्ससाठी आणली खास ‘क्रिकेट प्लान’
आयपीएलचा पंधरावा हंगाम २६ मार्चपासून सुरू होत असून, क्रिकेट चाहते आयपीएलचा थरार अनुभवण्यास सज्ज झाले आहेत. वेगवेगळ्या चॅनेल्सबरोबरच डिस्ने प्लस हॉटस्टार वरून आयपीएलच्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्यामुळे जिओने आता निवडक यूजर्ससाठी स्वस्तातला क्रिकेट प्लान आणला आहे. रिलायन्स जिओने २७९ रुपयांचा क्रिकेट प्लान आणला आहे. प्रीपेड यूजर्ससाठी ही ऑफर असून, २७९ रुपयांच्या या […]
ADVERTISEMENT

आयपीएलचा पंधरावा हंगाम २६ मार्चपासून सुरू होत असून, क्रिकेट चाहते आयपीएलचा थरार अनुभवण्यास सज्ज झाले आहेत. वेगवेगळ्या चॅनेल्सबरोबरच डिस्ने प्लस हॉटस्टार वरून आयपीएलच्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्यामुळे जिओने आता निवडक यूजर्ससाठी स्वस्तातला क्रिकेट प्लान आणला आहे.
रिलायन्स जिओने २७९ रुपयांचा क्रिकेट प्लान आणला आहे. प्रीपेड यूजर्ससाठी ही ऑफर असून, २७९ रुपयांच्या या प्रीपेड प्लानमध्ये एका वर्षासाठी डिस्ने प्लसचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. जिओच्या या नवीन रिचार्ज प्लानमध्ये व्हॉईस कॉल लाभ समाविष्ट नाही. मात्र, हा प्लान घेतलेल्यांना डेटा आणि डिस्ने प्लस हॉटस्टार OTT चं सबस्क्रिप्शन मिळणार आहे.
जिओच्या प्लानमध्ये काय?
जिओच्या २७९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये एका वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन मिळणार आहे. त्याचबरोबर १५ जीबी हाय-स्पीड डेटा दिला मिळणार आहे. हा प्लान घेतल्यानंतर डेटा वैधता प्लानच्या वैधतेपर्यंतच राहणार आहे.