मोहन भागवतांनी घेतली मिथुनदांची भेट, बंद खोलीत काय झाली चर्चा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या काही वर्षापासून भाजपने बंगालचा गड मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच सगळ्यादरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली आहे. दोघांमधील ही भेट मुंबईत झाली आहे. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी मंगळवारी सकाळी मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मिथुन हे जेव्हा नागपूरला गेले होते तेव्हा त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. तेव्हाच त्यांनी मोहन भागवत यांना आपल्या मुंबईतील घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. दरम्यान, आता बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप एक चेहरा शोधत असताना सरसंघचालक मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेणं हा चर्चेचा विषय ठरला आहे. पण असं असलं तरीही मिथुन यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

मोहन भागवतांच्या भेटीनंतर काय म्हणाले मिथुन?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मोहन भागवत यांच्या भेटीबाबत बोलताना मिथुन म्हणाले की, ‘माझा त्यांच्याशी आध्यात्मिक संबंध आहे, माझी जेव्हा त्यांच्याशी भेट झाली होती तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की, ते जेव्हाही मुंबईत येतील तेव्हा त्यांनी माझ्या घरी यावं. त्यामुळे या भेटीबाबत फार काही अंदाज व्यक्त करु नका. कारण तसं काहीही नाही.’

ही बातमी वाचलीत का?: ‘मी बंद खोलीत वचनं देत नाही’, पाहा अमित शाह सेनेबाबत काय म्हणाले!

ADVERTISEMENT

बंगालमध्ये जन्म झालेल्या मिथुन चक्रवर्ती यांचा जीवन प्रवास जर आपण पाहिला तर त्यामध्ये डिस्को डान्सर ते सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय नेता असं सारं काही आहे. कारण मिथुन चक्रवर्ती हे राज्यसभा खासदार देखील होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तृणमूल काँग्रेसनेच त्यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. पण शारदा घोटाळा समोर आल्यानंतर दोन वर्ष खासदार पद भूषविलेल्या मिथुनदांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

ADVERTISEMENT

बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजप आपलं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी स्थानिक चेहरा शोधत आहे. अशावेळी मिथुनदा यांची आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. आतापर्यंत बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी क्रिकेटर सौरव गांगुली हा राजकारणात उतरणार अशी जोरदार चर्चा सुरु होती. पण जेव्हापासून गांगुलीच्या हार्ट अटॅकची बातमी समोर आली तेव्हापासून त्याचं नाव काहीसं मागे पडलं.

ही बातमी पण पाहा: “महाराष्ट्रात मुघलराज असेल तर देशातल्या सरकारला काय म्हणायचं?”

दुसरीकडे भाजप सातत्याने दावा करत आहे की, बंगाल निवडणुकीत बंगालमधील नेत्यालाच प्रमोट केलं जाईल. ममता बॅनर्जी यांची सत्ता खालसा करण्याचं आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वीकारलं आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना अमित शाह असं म्हणाले होते की, भाजप बंगलाच्या मातीतील नेत्याकडेच नेतृत्व दिलं जाईल. त्यामुळे या निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने उतरत आहे. त्यासाठी त्यांना एका अत्यंत महत्त्वाच्या चेहऱ्याची गरज आहे. पण त्यांना हवा तसा चेहरा किंवा नेता सापडू शकलेला नाही. त्यामुळेच मिथुन चक्रवर्ती आणि मोहन भागवत यांची भेट ही अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT