Shiv Sena: ‘पुन्हा राजभवनात पहाटेची लगबग सुरु होईल, असे स्वप्न पडत असेल तर…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या (Saamana) अग्रलेखातून आज (1 जुलै) पुन्हा एकदा भाजप (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. ‘आता दोन-पाच दिवसात पुन्हा एकदा राजभवनात पहाटेची लगबग सुरु होईल असे स्वप्न कुणाला पडत असेल तर तो एक राजकीय स्वप्नदोषच म्हणावा.’ असा टोमणा शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

ADVERTISEMENT

‘उद्धव ठाकरे हे मध्यंतरी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना भेटले. मोदी-ठाकरे भेटीत महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाचीच बातचित झाली व आता दोन-पाच दिवसात पुन्हा एकदा राजभवनात पहाटेची लगबग सुरु होईल असे स्वप्न कुणाला पडत असेल तर तो एक राजकीय स्वप्नदोषच म्हणावा.’ अग्रलेखातून अशा प्रकारे राज्यातील भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

यावेळी अग्रलेखातून थेट महाभारताशी तुलना करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्राचे सरकार हे कुरुक्षेत्राच्या मध्यभागीच उभे आहे. विरोधकांनी स्वत:चा अभिमन्यू होऊ देऊ नये म्हणजे झालं.’ असं मत अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

‘शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना मंगळवारी भेटले दोघांमध्ये तासभर ‘गुफ्तगू’ झाले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पडताना पवारांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद स्पष्ट दिसत होता. मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वासही गेल्या काही दिवसांत चांगलाच वाढला आहे.’ असं म्हणत हे सरकार काही केल्या पडणार नाही अशी स्पष्टोक्तीच सामनातून देण्यात आली आहे.

दरम्यान, यावेळी अग्रलेखातून अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधण्यात आला. ‘महाराष्ट्राने दिल्लीशी सतत भांडत राहावे मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्यात सदैव आदळआपट सुरु राहावी किंवा येथील काही लोकांना वाटू शकते की, आम्ही इथे इतके तालेवार लोक असताना मुख्यमंत्री ठाकरे हे आमच्या मध्यस्थीशिवाय मोदींना भेटतातच कसे?’ असं म्हणत अप्रत्यक्षपणे फडणवीसांना देखील टोला लगावण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Sanjay Raut: ‘काय कराल, तुरुंगात टाकाल ना…,’ सरनाईकांच्या पत्रानंतर राऊतांनी भाजपला दिलं आव्हान

ADVERTISEMENT

‘महाराष्ट्रातील काही मंत्री, आमदार, सरकारविषयी सहानुभूती ठेवणारे उद्योजक यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून राज्यातील विरोधी पक्षाने हलचल माजविण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. अशा दबावापुढे सरकार पक्षाने न झुकता प्रतिकार करत राहणे हाच योग्य उपाय आहे.’ असं देखील अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार या चर्चांनी जोर धरला होता. त्यातच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींशी भेट घेतल्यानंतर राज्यात सत्ता बदल होणार असं सातत्याने बोललं जात होतं. मात्र, पवार-ठाकरे भेटीनंतर राज्यातील सत्ता स्थिर असल्याचं दावा आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT