Thackeray : अदानी मोदींसाठी ‘होली काऊ’, शिवसेनेनं (UBT) डिवचलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shiv Sena (uddhav balasaheb Thackeray) criticized pm Narendra Modi : अदानी समूह हिंडेनबर्ग अहवालामुळे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) याचं मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरलं. काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना यावरून लक्ष्य केलं आणि काही सवालही उपस्थित केले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर बोलणं टाळलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात अदानींचा (Adani) कुठेही उल्लेख न केल्यानं आता शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) डिवचलं आहे.

शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून अदानींवरून मोदींवर टीकेचे बाण डागले आहेत. “अदानी अदानी अशा घोषणा लोकसभा आणि राज्यसभेत सुरू असतानाही पंतप्रधान मोदी यांनी अदानी घोटाळ्यावर एक शब्दही उच्चारला नाही, पण अदानी घोटाळ्यांवर उतारा म्हणून मोदींच्या सरकारने 14 फेब्रुवारी रोजी ‘गाय आलिंगन दिन’ साजरा करण्याचे फर्मान सोडले.”

भाजपचे व संघाचे हिंदुत्व हे असे आहे, शिवसेनेनं (UBT) काय म्हटलंय?

“लोकांना अदानी घोटाळ्यांवर पंतप्रधानांकडून स्पष्टीकरण हवे होते, पण मोदी सरकारने लोकांना पुन्हा एकदा धर्माच्या गुंगीचे औषध देऊन गप्प केले. मोदी संसदेत अदानींवर बोलले नाहीत व त्यांचे सरकार त्याच वेळी गाईवर बोलले. अदानी हे शेअर बाजारातील ‘बिग बुल’ आहेत. पंतप्रधान त्या ‘बिग बुल’ला मिठी मारून बसले आहेत. ती मिठी जराही सैल करायला ते तयार नाहीत. लोकांनी विचारले, त्या मिठीचे रहस्य काय? त्याचे उत्तर न देता त्यांनी फर्मान काढले, ‘लोकांनी गाईस मिठी मारावी.’ भाजपचे व संघाचे हिंदुत्व हे असे आहे”, अशा शब्दात शिवसेनेनं मोदींना लक्ष्य केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘Uddhav ठाकरे जंटलमन, मनात कपटीपणा नाही’, माजी CM कडून प्रचंड कौतुक

लोकांच्या हत्या का घडवल्या?, सेनेचा संघ आणि भाजपला सवाल

“संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी पंधरा दिवसांपूर्वीच जयपुरात एक खळबळजनक विधान केले. त्यांनी सांगितले, ‘गोमांस खाणाऱ्यांनाही संघाचे दरवाजे उघडे आहेत.’ म्हणजे गाईंना खाटीकखान्यात न्यायची परवानगीच संघाने दिली व इकडे मोदी सरकारने ‘काऊ हग डे’ म्हणजे गाईस मिठी मारण्याचे फर्मान सोडले. गोमांस खाणाऱ्यांना संघाचे दरवाजे उघडे असतील तर मग गोमांस खाण्यावरून लोकांच्या हत्या का घडवल्या? याचे उत्तर देशाला मिळायला हवे”, असा सवाल शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

Shiv Sena (UBT) : अदानींसह सर्व महाघोटाळ्यांचे पाप धुऊन निघणार आहे काय?

“या वर्षी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी जनतेकडे मते मागताना सांगण्यासारखे काहीच नसल्याने मोदी सरकार देशाला पुनः पुन्हा धर्म आणि भावनिक मुद्द्यांमध्ये गुंतवीत आहे. हिंदू मतांसाठीच राममंदिर व गाईंचे राजकारण सुरू झाले आहे. गाय हे आपल्या संस्कृतीचे व धर्माचे प्रतीक जरूर आहे, पण गाईला मिठी मारल्यास अदानींसह सर्व महाघोटाळ्यांचे पाप धुऊन निघणार आहे काय?”, असं टीकास्त्र ठाकरें गटाने मोदी डागलं आहे.

ADVERTISEMENT

Billionaires List : मुकेश अंबानींची Top-10 श्रीमंतांच्या यादीत पुन्हा वापसी!

“हे वीर सावरकर भाजप व संघ परिवारास मान्य आहेत काय?”

सावरकरांचे गाईबद्दलचे विचार सांगत शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाजपलाही लक्ष्य केलंय. शिवसेनेनं म्हटलं आहे की, “वीर सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी, पण सावरकरांचे गाईंबाबतचे विचार विज्ञानवादी होते. गाय हा एक उपयुक्त पशू आहे, गोमाता नाही, हे मत त्यांनी परखडपणे मांडले. हे वीर सावरकर भाजप व संघ परिवारास मान्य आहेत काय? बरे, गाईला मिठी मारली की भावनिक उन्नती होते हे मोदी सरकारचे म्हणणे वादासाठी मान्य केले तरी हा प्रकार गाईलाही मान्य असायला हवा ना.”

‘बिग बुल’ अदानी यांना मिठी मारून बसले आहे -Shiv Sena (UBT)

शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुढे म्हटलं आहे की, “देशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. पशुधनाच्या चारा-पाण्याचे वांधे झाले. अस्मानी आणि सुलतानीच्या कचाट्यात भरडून निघालेला शेतकरी पशुधनाचा सांभाळ कसा करायचा, स्वतःच्या पोरांचे पोट भरायचे की पशुधनाचे या विवंचनेत आहे. त्याची ही विवंचना दूर करणे राहिले बाजूला, मोदी सरकार एकीकडे जनतेला ‘गाईला मिठी मारा’ असे फर्मान सोडते आहे आणि दुसरीकडे स्वतः ‘बिग बुल’ अदानी यांना मिठी मारून बसले आहे.”

PM Modi: ‘काल काही लोक उड्या मारत होते’, मोदींचे राहुल गांधींना टोमणे

“अदानी हे शेअर बाजारातील ‘बिग बुल’ असले तरी मोदी यांच्यासाठी ते ‘होली काऊ’ आहेत. तसे नसते तर या ‘होली काऊ’साठी त्यांनी इतका आटापिटा केला नसता. इकडे गोमाता चारा-पाण्याशिवाय हंबरते आहे आणि मोदी सरकार ‘बिग बुल’च्या दाणापाण्याचे पाहात आहे, जनतेला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी गाईला मिठी मारायला सांगत आहे. चारा-पाण्याशिवाय हंबरणाऱ्या गाईला मिठी मारल्याने, उधळलेल्या ‘बिग बुल’च्या गुन्ह्यांची चौकशी मोदींचे सरकार करणार आहे काय?”, असा सवाल करत शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोदींना घेरलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT