मला बळीचा बकरा बनवलं सचिन वाझेंचं NIA कोर्टात वक्तव्य, वाझेंना ३ एप्रिल पर्यंत कोठडी

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अँटेलिया केसमध्ये आणि त्यानंतर होणाऱ्या इतर आरोपांच्या प्रकरणांमध्ये मला बळीचा बकरा बनवलं जातं आहे असं सचिन वाझे यांनी NIA कोर्टात म्हटलं आहे. अँटेलिया प्रकरणाचा तपास हा फक्त दीड दिवसासाठी माझ्याकडे होता. मी या प्रकरणाचा तपास तशाच पद्धतीने करत होतो जसा करायला हवा होता. तसाच मी करत होतो असंही सचिन वाझे यांनी कोर्टात सांगितलं. मला या सगळ्या प्रकरणात अडकवलं जातं आहे. मी यामधला कोणताही गुन्हा केलेला नाही. माझ्याकडे हे संपूर्ण प्रकरण फक्त दीड दिवसासाठी होतं. त्यानंतर अचानक काही बदल झाले असंही सचिन वाझे यांनी स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

सचिन वाझे पांढरा कुर्ता घालून पुन्हा त्याच मार्गावर, अँटिलीया बाहेर NIA कडून Crime Recreation

NIA ने कोर्टात काय सांगितलं?

हे वाचलं का?

सचिन वाझेंच्या घरी ६२ बेहिशेबी बुलेट सापडल्या. ज्या ३० बुलेट त्यांना अधिकृतपणे देण्यात आल्या होत्या त्यातल्या फक्त ५ बुलेट सापडल्या आहेत. ६२ बेहिशेबी बुलेट सचिन वाझेंनी का स्वतःकडे ठेवल्या होत्या त्यामागचं कारण काय आहे? तेदेखील समजलेलं नाही. एक मोठा CDR ही हाती लागला आहे असंही NIA ने सांगितलं. सचिन वाझे यांनी मोठ्या प्रमाणवरचा डेटा हा नष्ट केला आहे, तो रिट्राइव्ह करण्याचं कामही सुरू आहे असंही NIA ने स्पष्ट केलं. हे सगळं जेव्हा कोर्टात एनआयएकडून सांगितलं जात होतं तेव्हा सचिन वाझे यांनी नकारार्थी मान हलवली. NIA कोर्टाने सचिन वाझेंच्या कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

Exclusive: सचिन वाझेंसोबत कारमध्ये होते मनसुख हिरेन, CCTV फुटेजमधून मोठा खुलासा

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

ADVERTISEMENT

अँटेलिया या मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर एक स्कॉर्पिओ आढळून आली. या स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या. हे प्रकरण म्हणजे घातपाताचा प्रकार आहे असं वाटलं होतं कारण या स्कॉर्पिओमध्ये मुकेश अंबानींच्या नावाने धमकीचं पत्रही लिहिण्यात आलं होतं. या सगळ्या प्रकरणात कार कुणाची याचा तपास सुरू झाला. ती कार मनसुख हिरेन यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली. अँटेलियाचा मुद्दा हा विधानसभेतही भाजपने उचलून धरला. त्यानंतर ५ मार्चला मनसुख हिरेन यांना सुरक्षा पुरवली पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ज्यानंतर त्याच दिवशी दोन तासांनी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत मिळाला.

त्यानंतर या सगळ्या प्रकरणाला अनेक वळणं लागली. सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांचे व्यावसायिक संबंध. मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी माझ्या पतीचा मृत्यू बुडून झाला नसून तो खून आहे हा खून सचिन वाझेंनी केला आहे असा मला संशय आहे असाही जबाब दिला. सचिन वाझे प्रकरणावरून चांगलंच राजकारणही रंगलं.

अँटेलिया स्कॉर्पिओ स्फोटकांचं प्रकरण हे NIA कडे होतं, तर मनसुख हिरेन हत्या प्रकरण हे एटीएसकडे होतं. NIA ने अँटेलिया प्रकरणात सचिन वाझेंना १३ मार्चच्या रात्री उशिरा अटक केली. तर महाराष्ट्र एटीएसने या प्रकरणात आणखी दोघांनाही अटक केली. तर मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास हा देखील NIA कडे देण्यात यावा असंही स्पष्ट करण्यात आलं होतं. एटीएसने या प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्याच्या आधीच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची उकल केल्याचा दावा केला. त्यानंतर बुधवारी ठाणे सत्र न्यायालयाने एटीएसने मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास हा तातडीने NIA कडे दिला जावा असे आदेश दिले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT