ग्राहकांसाठी खुशखबर! भारत-पाकिस्तान तणाव कमी होताच सोनं गडगडलं, किती रुपयांनी झालं स्वस्त?

मुंबई तक

Today Gold Rate : भारत-पाकिस्तान तणावामुळे मागील एक आठवड्यात सोन्याचे भाव तीन हजार रुपयांनी वाढल्याचं पाहायला मिळालं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : भारत-पाकिस्तान तणावामुळे मागील एक आठवड्यात सोन्याचे भाव तीन हजार रुपयांनी वाढल्याचं पाहायला मिळालं. आज सोमवारी 12 मे रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचं समोर आलं आहे. आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात किंमती घसरल्याने सोनं स्वस्त झालं आहे.

परंतु, एक्सपर्टच्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवसांत सोन्याच्या भावात वाढ होऊ शकते. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 96 हजार रुपयांच्या पार गेले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 88 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती..

मुंबई 

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 96880 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 88800 रुपये झाले आहेत.

पुणे

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 96880 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 88800 रुपये झाले आहेत.

हे वाचलं का?