सचिन वाझेवर होणार ‘ही’ शस्त्रक्रिया, भिवंडीतील रुग्णालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
भिवंडी: अँटेलिया कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार असून त्याला भिवंडी येथील एस. एस. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिन वाझेवर एंजोप्लास्टी किंवा ओपन हार्ट सर्जरी केली जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट रोजी […]
ADVERTISEMENT

भिवंडी: अँटेलिया कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार असून त्याला भिवंडी येथील एस. एस. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिन वाझेवर एंजोप्लास्टी किंवा ओपन हार्ट सर्जरी केली जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट रोजी एस एस हॉस्पिटलचे असिस्टंट आर एम ओ फुरकान यास आरोपी सचिन वाजे यांचे नातेवाईक येऊन भेटले यावेळी त्यांनी त्याच्या उपचाराची फाईल दाखविली. त्यानंतर संबंधित डॉक्टरांशी बोलून फुरकान यांनी वाझेच्या उपचारासाठी संमती पत्र उपलब्ध करून दिले.
त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी न्यायालयाने त्याबाबत ऑर्डर करून सचिन वाझेला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे 31 ऑगस्ट रोजी सचिन वाझेला दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास उपचारासाठी एस. एस. हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं.
इथे डॉक्टर विनीत रणवीर यांनी त्याची तपासणी केली. ज्यामध्ये वाझेच्या रक्तातील साखर वाढल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, 29 ऑगस्टला जे.जे.हॉस्पिटल येथे वाझेचे ब्रेन एमआरआय देखील करण्यात आले होते. ज्याचे रिपोर्ट हे नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेले आहे.









