महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची घटना शुक्रवारी घडली. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्या युतीची घोषणा आज करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा करण्यात आली. आगामी निवडणुका समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. एकनाथ शिंदे आणि पक्षातील ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली […]
ADVERTISEMENT

शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची घटना शुक्रवारी घडली. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्या युतीची घोषणा आज करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा करण्यात आली. आगामी निवडणुका समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
एकनाथ शिंदे आणि पक्षातील ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. या घडामोडीनंतर आज संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबतच्या युतीची घोषणा केली.
मातोश्री निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते सुभाष देसाई, संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे आणि मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे हे उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे म्हणाले, ‘संभाजी ब्रिगेड गेल्या ३० वर्षांपासून महाराष्ट्रात शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, भारताचं संविधान आणि लोकशाही ही मानवी मूल्ये घेऊन महाराष्ट्रात काम करत आहे.”