NCB: समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ आरोपानंतर खात्यातंर्गत चौकशी सुरु

मुंबई तक

मुंबई: मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) जे मुंबईतील ड्रग्स प्रकरणाच्या तपासानंतर प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आले. मात्र आता त्यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. कारण आता त्यांच्याविरुद्ध विजिलेन्स विभागाकडून चौकशीही सुरू झाली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांचं नेमकं भवितव्य काय? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) जे मुंबईतील ड्रग्स प्रकरणाच्या तपासानंतर प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आले. मात्र आता त्यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. कारण आता त्यांच्याविरुद्ध विजिलेन्स विभागाकडून चौकशीही सुरू झाली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांचं नेमकं भवितव्य काय? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, ‘समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांची खात्यातंर्गत चौकशी केली जात आहे.’ समीर वानखेडे हे पदावर कायम राहणार की नाही? या प्रश्नावर ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, ‘ते या पदावर कायम राहतील की नाही याबाबत आता सध्या तरी काहीही सांगता येणार नाही.’

दरम्यान, समीर वानखेडे यांना राजधानी दिल्लीतील एनसीबीच्या मुख्यालयात बोलावलं जाण्याची देखील शक्यता आहे. त्याच्याबाबत दिल्लीतील एनसीबीच्या मुख्यालयातही चर्चा सुरू आहे. ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की ते, चालू असलेल्या तपासावर देखरेख करत आहेत. चौकशी सुरू झाल्यामुळे ते या पदावर राहतील की नाही यावर काहीही बोलणे फार आताच घाईचे ठरेल.

मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मेलद्वारे एनसीबीवरील आरोपांबाबत DG NCB यांना एक सविस्तर अहवाल सादर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे आढावा बैठकीसाठी दिल्लीला पोहोचत आहेत. यादरम्यान डीजी सत्य नारायण प्रधानही एनसीबीवरील आरोपांवर समीर वानखेडेंशी बोलणार असल्याचं समजतं आहे.

हे वाचलं का?