नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात माजी सैनिकांची टास्क फोर्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता…स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध कडक करायला सुरुवात केली आहे. सांगली महापालिकेने कोरोनाविषयक नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी १५ माजी सैनिकांची टास्क फोर्स नियुक्त केली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुढाकार घेऊन या टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

ADVERTISEMENT

माजी सैनिकांच्या या टास्क फोर्सने सांगलीच्या बाजारपेठेत फिरून नागरिकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजरचा वापर करण्याबद्दल आवाहन केलं. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता सांगली, मिरज आणि कुपवाड भागात विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही हे भान लोकांना रहावं यासाठी सांगलीमध्ये माजी सैनिकांची ही टास्क फोर्स काम करणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विळखा बसलेल्या विदर्भातील अमरावती आणि अकोला या शहरांमधली परिस्थिती अजुनही नियंत्रणात येताना दिसत नाहीये. फेब्रुवारी महिन्यात शहरातील रुग्णसंख्यांमध्ये होणारी वाढ पाहता जिल्हा प्रशासनाने अमरावती शहर आणि अचलपूर या भागात लॉकडाउनची घोषणा केली होती. परंतू यानंतरही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी अमरावतीमधला लॉकडाउन ८ मार्चपर्यंत वाढवला आहे. अमरावती आणि अचलपूरसोबत अंजनगाव सुर्जी हे गावही कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT