Kirit Somaiya: ‘CMO च्या संबंध नाही, सोमय्यांवरील कारवाई गृह मंत्रालयाकडून’, सेनेचा सेफ गेम?
मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, त्यांच्या याच आरोपाला उत्तर देताना शिवसेनेन अगदी ‘सेफ गेम’ खेळण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेने नेते संजय राऊत यांनी याबाबत बोलताना असं म्हटलं […]
ADVERTISEMENT
मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, त्यांच्या याच आरोपाला उत्तर देताना शिवसेनेन अगदी ‘सेफ गेम’ खेळण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT
शिवसेने नेते संजय राऊत यांनी याबाबत बोलताना असं म्हटलं आहे की, ‘किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा (CMO) काहीही संबंध नाही. ती कारवाई गृहमंत्रालयाकडून करण्यात आली आहे. अशी माहिती मला स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.’ अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.
म्हणजेच किरीट सोमय्या यांच्यावर जी काही कारवाई करण्यात आली आहे त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही. असंच राऊतांनी एकप्रकारे अधोरेखित केलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात शिवसेना आता ‘सेफ गेम’ खेळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
हे वाचलं का?
पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:
‘कालपासून जे काही घडतंय किंवा घडवलं जात आहे ते विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. अर्थात अशा प्रकारचे सतत आरोप करुन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं हा गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षाकडून उपक्रम राबवला जात आहे.’
ADVERTISEMENT
‘काल जी काही कारवाई झाली आहे आरोप करणाऱ्यांवर, मला वाटतं ती कारवाई गृहमंत्र्यांनी केली आहे. त्यामध्ये आकस किंवा सूड या शब्दाचा वापर कुणी करु नये. मी संपूर्ण प्रकरणाबाबत सकाळीच माहिती घेतली. त्यानुसार, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न निर्माण होतील असं वाटल्याने ती कारवाई गृहमंत्रालयाकडून झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर व्यक्तिगत आरोप करण्याची गरज नाही.’
ADVERTISEMENT
‘मुख्यमंत्री अशा लहान गोष्टींमध्ये पडत नाही. कोणी असे खोटेनाटे आरोप केले म्हणून आमच्या सरकारला भोकं पडत नाहीत. हे आम्हाला माहिती आहे. केंद्र सरकारवर रोज आरोप होत आहेत किंवा इतर राज्यातील भाजप सरकारवर रोज आरोप होत आहेत.’
‘आरोप करण्यापूर्वी तुमच्याकडे पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस, अँटी करप्शन ब्यूरो, यंत्रणा आहे. राज्यातील या सगळ्या संस्था कोणत्याही प्रकारे पक्षपात न करता तपास करतात. पण तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर, प्रमुख लोकांवर असे आरोप करत असाल आणि त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर राज्यातील गृहमंत्रालय त्यावर कारवाई करु शकतं. त्यानुसार राज्याच्या गृहमंत्रालयाने कारवाई केलेली आहे. त्याची आता फार मोठी राष्ट्रीय स्तरावर दखल घ्यायची गरज नाही.’
हसन मुश्रीफांवर आणखी 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट
‘मी मगाशीच मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोललो आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, ‘या सर्व कार्यालयाशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. काही ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर गृहमंत्रालयाने त्यासंबंधी कारवाई केली असेल.’ अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT