संजय राऊतांच्या नव्या ट्विटने सर्वांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय म्हणाले?
मुंबई: ‘आसमान मे उडने की मनाही नही है…. बस शर्त इतनी है की जमीन को नजर अंदाज ना करे’असा शेर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शेअर केला आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा खास आपल्या स्टाईलमध्ये शेर ट्विट केल्याने आता यामागील गर्भित इशारा नेमका कुणाला देण्यात आला आहे याची सध्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली […]
ADVERTISEMENT
मुंबई: ‘आसमान मे उडने की मनाही नही है…. बस शर्त इतनी है की जमीन को नजर अंदाज ना करे’असा शेर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शेअर केला आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा खास आपल्या स्टाईलमध्ये शेर ट्विट केल्याने आता यामागील गर्भित इशारा नेमका कुणाला देण्यात आला आहे याची सध्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. (sanjay raut new tweet)
ADVERTISEMENT
विधानसभा 2019 निवडणुकीनंतर राज्यात सत्ता पालट घडविण्यात संजय राऊत यांचा मोठा हात होता. त्यावेळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते अशी संजय राऊतांची ओळख निर्माण झाली होती. आपल्या दररोजच्या पत्रकार परिषदांमुळे तेव्हा राऊत सतत चर्चेत असायचेच पण त्याचवेळी त्यांच्या ट्विटरवरील शेरो-शायरीमुळे देखील ते सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे ओढून घ्यायचे.
आता राज्यात त्यांच्या पक्षाची सत्ता आलेली असताना देखील ते कधी सामनाती अग्रलेखाच्या माध्यमातून तर कधी ट्विटरवरील शेरोशायरीमधून ते सरकारच्या कामकाजावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात.
हे वाचलं का?
बुरा न मानो..
होली है……… pic.twitter.com/4pqmYKGJoC— Sanjay Raut (@rautsanjay61) March 28, 2021
आज (28 मार्च) पुन्हा एकदा सकाळी संजय राऊतांनी सकाळीच एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की, ‘आसमान मे उडने की मनाही नही है…. बस शर्त इतनी है की जमीन को नजर अंदाज ना करे’याचाच अर्थ ते यामधून कुणाला तरी इशारा देत आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांची एकूण वक्तव्य पाहता हा इशारा बहुदा त्यांनी आपल्या सरकारलाच दिला असल्याची दाट शक्यता आहे.
‘अनिल देशमुखांना अपघातानं मिळालं गृहमंत्रीपद’, सामनातून शिवसेनेचा गौप्यस्फोट
ADVERTISEMENT
राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक वेगवेगळ्या विषयावरुन राज्य सरकारवर टीका होत आहे. अशावेळी राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याचं देखील दिसून आलं होतं. त्यावेळी देखील संजय राऊतांनी परखडपणे मत मांडलं होतं. सध्या राज्यात अँटेलिया, सचिन वाझे, लेटरबॉम्ब आणि फोन टॅपिंग यामुळे राज्यात सध्या राजकीय उलथापालथ सुरु आहे. विरोधकांकडून टीकेचा भडीमार सुरु आहे. अशावेळी सरकार म्हणून विरोधकांना अंगावर घेणं कुणालाही जमलं नाहीए. याच गोष्टीकडे राऊतांनी देखील आधीपासून लक्ष वेधलं आहे.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस बॉम्ब घेऊन आले पण तो भिजलेला लवंगी फटाका निघाला-संजय राऊत
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून विरोधकांच्या हातात फार काही मुद्दे लागत नव्हते. त्यामुळे सरकारमधील अनेक नेते हे निश्चिंत झाल्याचं दिसत असल्यानेच राऊतांनी आता त्यांना पाय जमिनीवर ठेवण्याचं एक प्रकारे आवाहन केलं आहे. त्यामुळे आता सरकार आणि विशेषत: शिवसेनेतील नेते राऊतांच्या या ट्विटकडे कसं पाहतात हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे.
उद्धव ठाकरे आपल्या माणसालाही सोडणार नाहीत- संजय राऊत
दरम्यान, आज (28 मार्च) ‘सामना’तील रोखठोक या विशेष सदरात संजय राऊतांनी सरकारला बरचे खडे बोल देखील सुनावले आहेत. ‘गेल्या काही महिन्यांत जे घडले त्यामुळे महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. वाझे हा साधा फौजदार. त्याचे इतके महत्त्व का वाढले? हाच तपासाचा विषय.
गृहमंत्र्यांनी वाझेंना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग करतात. त्या आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आले नाही! सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसले.’ असं राऊतांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT