‘…तर सरकारला अमित शाहदेखील वाचवू शकणार नाहीत’, भाजपावाले सांगताहेत म्हणत संजय राऊतांचं विधान
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून महाराष्ट्रात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील अनेक गावांवर दावा सांगितल्यानं सत्ताधाऱ्यांना विरोधकांकडून लक्ष्य केलं जात आहे. खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून एकनाथ शिंदे आणि 40 बंडखोर आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्यावर बोट ठेवत खडेबोल सुनावले आहेत. राऊतांनी मंत्रालय, मुंबई-ठाणे महापालिकेतील व्यवहारांवरही बोट ठेवलंय. संजय राऊत रोखठोकमध्ये म्हणतात, “30 […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून महाराष्ट्रात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील अनेक गावांवर दावा सांगितल्यानं सत्ताधाऱ्यांना विरोधकांकडून लक्ष्य केलं जात आहे. खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून एकनाथ शिंदे आणि 40 बंडखोर आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्यावर बोट ठेवत खडेबोल सुनावले आहेत. राऊतांनी मंत्रालय, मुंबई-ठाणे महापालिकेतील व्यवहारांवरही बोट ठेवलंय.
संजय राऊत रोखठोकमध्ये म्हणतात, “30 तारखेस सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नी सुनावणी होणार म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे दोन दिवस आधीच दिल्लीत ठाण मांडून बसले व तेथे बसून पत्रकारांशी संवाद साधत होते. या काळात आपले मुख्यमंत्री कोठे गायब होते? महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नात तर त्यांची खरी कसोटी लागणार आहे. दिल्लीच्या नाकर्तेपणाचे सर्व ओझे आता त्यांच्या खांद्यावर येईल; कारण ‘सीमा प्रश्नासाठी आम्ही चाळीस दिवस बेळगावच्या तुरुंगात होतो,’ असा डांगोरा त्यांनीच पिटला आहे. त्यामुळे ते आता काय करणार?”
संजय राऊत म्हणाले, “चंद्रकांत पाटील व शंभू राजे देसाई या दोन मंत्र्यांना बेळगावात पाठवून काय साध्य होणार? हे वेळकाढूपणाचे धोरण ठरेल. कर्नाटकात आज भाजपचे मुख्यमंत्री आहेत व महाराष्ट्रात भाजपपुरस्कृत शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सीमा प्रश्न सुटला तर आनंदच आहे, पण त्यासाठी जी हिंमत व धमक लागते ती आपल्या मुख्यमंत्र्यांत दिसत नाही व भाजपचे महाराष्ट्रातील लोक शिंदे यांची मजा पाहत आहेत. शिंदे यांना फार लोकप्रियता व यश लाभू द्यायचे नाही असे एकंदरीत धोरण आहे”, असं म्हणत राऊतांनी भाजपकडे अंगुली निर्देश केलाय.
Jitendra Awhad: “CM एकनाथ शिंदे म्हणतील तुला माहित आहे ना? मी हे करू शकत नाही”