सातारा जिल्हा बँक निवडणूक : प्रभाकर घार्गे कोठडीतून थेट मतदान केंद्रावर, पोलिसांचा कडा पहारा
–इम्तियाज मुजावर, सातारा खटाव सोसायटी मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना न्यायालयीन कोठडीतून पोलीस बंदोबस्तात वडूज येथील मतदान केंद्रावर सकाळी साडेआठ वाजता हजर आणण्यात आलं. सहकार पॅनलच्या नंदकुमार मोरे यांच्या विरूद्ध घार्गे यांची हाय व्होल्टेज लढत होत आहे. यावेळी मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आला होता. सातारा जिल्हा बॅंकेच्या संचालक […]
ADVERTISEMENT
–इम्तियाज मुजावर, सातारा
ADVERTISEMENT
खटाव सोसायटी मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना न्यायालयीन कोठडीतून पोलीस बंदोबस्तात वडूज येथील मतदान केंद्रावर सकाळी साडेआठ वाजता हजर आणण्यात आलं. सहकार पॅनलच्या नंदकुमार मोरे यांच्या विरूद्ध घार्गे यांची हाय व्होल्टेज लढत होत आहे. यावेळी मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आला होता.
सातारा जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. खटाव तालुका सोसायटी मतदारसंघात सहकार पॅनलचे उमेदवार नंदकुमार मोरे आणि बंडखोरी केलेले माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत आहे. वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. वडूजमधील वाहतुकीत बदल करण्यात आला असून, तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
प्रभाकर घार्गे एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर हजर रहाण्याची न्यायालयाने त्यांना परवानगी दिली होती. साडेआठ वाजता पोलीस बंदोबस्तात घार्गे यांना मतदान केंद्रावर आणण्यात आलं. त्यांच्या पत्नी इंदिरा घार्गे आणि कन्या प्रिती घार्गे यांनी गेला महिनाभर निवडणुकीची खिंड लढवून सहकार पॅनलचा घामटा काढला.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नंदकुमार मोरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याने राष्ट्रवादीसाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. तालुक्याच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी आणि ओबीसी मतदारसंघाचे उमेदवार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते सकाळपासूनच वडूज मतदान केंद्रावर ठाण मांडून बसले आहेत.
ADVERTISEMENT
गेला महिनाभरापासून ‘आऊट ऑफ कव्हरेज’ असलेले मतदार समुहाने मतदानासाठी येवू लागल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
ADVERTISEMENT
सातारा जिल्हा बँकेसाठी 68.38 टक्के मतदान
सातारा जिल्हा बँकेसाठी आज (21 नोव्हेंबर) मतदान होत असून, 10 जागांसाठी 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत बँकेसाठी 68.38 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान जावली, तर कमी मतदान माण तालुक्यात झाले आहे. सातारा तालुक्यात 68.32 टक्के, जावली 95.65 टक्के, महाबळेश्वर 66.67 टक्के, कराड 71.8 टक्के, पाटण 89.66 टक्के, कोरेगाव 64.81 टक्के, खटाव 61.33 टक्के, माण 47.6 टक्के, खंडाळा 51.4 टक्के, वाई 62.12 टक्के आणि फलटण तालुक्यात 72.91 टक्के मतदान झाले आहे. जिल्हा बँकेसाठी आतापर्यंत एकूण 68.38 टक्के मतदान झाले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT