साताऱ्यात प्रेमाचा झांगडगुत्ता! लॉकडाऊनमुळे आला दुरावा अन् प्रेयसीचा दुसऱ्यावरच जडला जीव
–इम्तियाज मुजावर, सातारा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचं आयुष्यच बदलून गेलं. कोरोना लॉकडाऊनच्या काळातच एका प्रेमवीराचं ब्रेकअप झालं. भेटीगाठी आणि संवादात दुरावा आल्यानं प्रेयसी दुसऱ्याच्याच प्रेमात पडली. त्यानंतर जे घडलं त्यामुळे त्याच्या प्रेमाची ब्रेकअप स्टोरी अगदी पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचली. प्रेमभंग झाल्याने चिडलेल्या प्रेमवीरांने चक्क प्रेयसीलाच पळवण्याचा प्रयत्न केला. यातूनच हाणामारी, पळवापळवी अन् जखमी झाल्याचा प्रकार […]
ADVERTISEMENT

–इम्तियाज मुजावर, सातारा
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचं आयुष्यच बदलून गेलं. कोरोना लॉकडाऊनच्या काळातच एका प्रेमवीराचं ब्रेकअप झालं. भेटीगाठी आणि संवादात दुरावा आल्यानं प्रेयसी दुसऱ्याच्याच प्रेमात पडली. त्यानंतर जे घडलं त्यामुळे त्याच्या प्रेमाची ब्रेकअप स्टोरी अगदी पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचली. प्रेमभंग झाल्याने चिडलेल्या प्रेमवीरांने चक्क प्रेयसीलाच पळवण्याचा प्रयत्न केला. यातूनच हाणामारी, पळवापळवी अन् जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
चित्रपटाची पटकथा वाटावी अशीच एक प्रेमभंगाची घटना साताऱ्यात घडली. या कहाणीमध्ये युवक व युवती यांच्या प्रेमाची सुरुवात साधारण तीन वर्षांपासून झाली होती. तो फलटण तालुक्यातील, तर ती सातारची. ती कॉलेजला, तो मात्र कमी शिकलेला पण कामावर जाणारा. आठवड्यातून तो किमान दोन वेळा तरी तिला भेटायला हमखास सातार्याला यायचा. मग प्रेमाच्या आणाभाका घेत कॅफे, हॉटेल करत अनेकदा यवतेश्वर घाट, कासची देखील सफर केली. लग्नाची स्वप्ने पाहून सगळं नियोजन सुरू झालं. प्रेम बहरात आलेलं असतानाच कोरोना आला.
झालं असं की कोरोनानंतर लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे दोघांच्या जवळपास थांबल्याच. सुरुवातीला कोरोना जाईल आणि पुन्हा जुने दिवस परततील असंच या प्रेमवीरांना वाटलं. याच आशेवर पुढचे 5 ते 6 महिने गेले.