गोपीनाथ मुंडे असते तर आज महाराष्ट्रात युती कायम राहिली असती – संजय राऊतांचं वक्तव्य
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे या दोन दिग्गज नेत्यांची जयंती एकाच दिवशी असते. आजच्या दिवशी भाजपचा जुना मित्र आणि महाविकास आघाडी सरकारच्या निमीत्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन मित्र झालेल्या शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत असताना शिवसेना खासदार संजय राऊतांनी, […]
ADVERTISEMENT
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे या दोन दिग्गज नेत्यांची जयंती एकाच दिवशी असते. आजच्या दिवशी भाजपचा जुना मित्र आणि महाविकास आघाडी सरकारच्या निमीत्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन मित्र झालेल्या शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत असताना शिवसेना खासदार संजय राऊतांनी, त्यांच्या तोडीचा एकही नेता भाजपमध्ये नाही असं म्हटलंय. इतकच नव्हे तर मुंडे आज असते तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.
“गोपीनाथ मुंडे असते तर आज राज्याचं राजकारण वेगळं असतं. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती राहावी यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. आज राज्याचं राजकारण समजणारा, ज्याच्याशी संवाद साधता येईल आणि शिवसेना काय आहे हे माहिती असणारा गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीचा नेता भाजपात दिसत नाही. आम्ही त्यांच्यासोबत २५-३० वर्ष फार जवळून काम केलं. तेसुद्धा एक लोकप्रिय नेते होते. आज बहुजन समाजाची चळवळ दिसत आहे त्याचे ते प्रणेते आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.
हे वाचलं का?
यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊतांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांचं अभिनंदन केलं आहे. “महाराष्ट्राचे, देशाचे सर्वात ज्येष्ठ, अनुभवी नेते म्हणून आम्ही शरद पवारांकडे पाहतो. महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवारांचं मोठं योगदान आहे. देशाचे संरक्षणमंत्री, कृषीमंत्री असताना या दोन्ही क्षेत्रात हा देश आत्मनिर्भर व्हावा म्हणून त्यांनी त्यावेळी अनेक पावलं टाकली. ते प्रचंड लोकप्रपिय, जनतेशी थेट संबंध असलेले आणि राजकारणात असूनही हवेत गप्पा न मारणारे असे नेते आहेत,” असं कौतुक संजय राऊत यांनी यावेळी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT