संजय राऊत यांच्या केसमध्ये शरद पवारांचं नाव, अजित पवार, बावनकुळे म्हणाले…

मुंबई तक

मुंबई: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीनं त्यांच्याविरोधात चार्टशीटस दाखल केली आहे. त्या चार्टशीटमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. २००६-०७ च्या दरम्यान संजय राऊत यांनी काही मिटिंग अटेंड केल्या होत्या. त्यातली एक बैठक तेव्हाचे केंद्रीय कृषी मंत्री असलेल्या शरद पवारांसोबत झाली होती. तर एक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीनं त्यांच्याविरोधात चार्टशीटस दाखल केली आहे. त्या चार्टशीटमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. २००६-०७ च्या दरम्यान संजय राऊत यांनी काही मिटिंग अटेंड केल्या होत्या. त्यातली एक बैठक तेव्हाचे केंद्रीय कृषी मंत्री असलेल्या शरद पवारांसोबत झाली होती. तर एक बैठक तत्कालीन मुख्यमंत्र्यांसोबत झाली होती. आता या प्रकरणावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

पत्राचाळ प्रकरणावर काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार म्हणाले ” तपास यंत्रणेने काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. ईडीची या प्रकरणात चौकशी सुरू आहे, प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. आत कोर्टात ज्यानं त्यानी आपली भूमिका मांडावी. कोर्ट काय निर्णय घेईल तो घेईल. यात काय आरोप होत आहेत यावर बोलणं योग्य नाही.”

पत्राचाळ घोटाळ्याला नवं वळण, संजय राऊतांच्या चार्जशीटमध्ये ईडीने केला शरद पवारांचा उल्लेख

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ” मला वाटतं हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य तपास यंत्रणा यांच्या संदर्भातील आहे. त्यामुळे जी काय चौकशी होईल त्यामध्ये हे सर्व समोर येईल. अतुल भातखळकर यांनी जर मागणी केली असेल तर गृहमंत्री त्याची चौकशी करतील, त्या बैठकीमध्ये काय झालं याची चौकशी होईल. त्यामुळे चौकशीअंती जे काय समोर येईल ते महाराष्ट्राला कळेलच.”