ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा का झाला? पोलिसांचा लाठीचार्ज
शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर येताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच आता शिंदे-ठाकरे गटात राडा झाला. किसन नगरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली. या प्रकरणी दोन्ही गटांकडून एकमेकांविरुद्ध तक्रारी देण्यात आली आहे. ठाण्यातल्या किसन नगरमधील भट वाडीत शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला. भट […]
ADVERTISEMENT

शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर येताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच आता शिंदे-ठाकरे गटात राडा झाला. किसन नगरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली. या प्रकरणी दोन्ही गटांकडून एकमेकांविरुद्ध तक्रारी देण्यात आली आहे.
ठाण्यातल्या किसन नगरमधील भट वाडीत शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला. भट वाडीत झालेल्या राड्यानंतर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारेंसह दोन्ही गटाचे कार्यकर्ते श्रीनगर पोलीस ठाण्यात बाहेर जमा झाले होते.
खासदार राजन विचारे यांच्या दिशेनं पाण्याची बाटली फेकल्याचंही म्हटलं गेलं. मात्र, दोन्ही गटाकडून वेगळी कारणं देण्यात आलीयेत.
शिंदे गटाने ठाकरे गटाला धरलं जबाबदार
ठाण्यात झालेल्या वादावर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के म्हणाले, “दोन गट आमने-सामने येण्याचा प्रश्नच नाही. मुद्दामहून भांडणं काढणं, या उद्देशानं हा प्रकार केलेला आहे आणि सहानुभूती घेणं याशिवाय काही राहिलेलं नाही”, असं नरेश म्हस्केंनी म्हटलंय.