शिंदे गटातील मंत्र्यांची मुलगी झाली सरपंच; राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून ठाकरे गटाचा पराभव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

(Shinde Group vs Thackeray Group)

ADVERTISEMENT

बीड : मंगळवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात अनेक लक्षवेधी निकाल लागले. गावपातळीवरच्या राजकारणात कुठे युवा सरपंच झाले, फॉरेन रिटर्न सरपंच झाले, तर कुठे भाजी विक्रेतेही गावच्या मदतीने सरपंच झाले. रत्नागिरीतील एका ग्रामपंचायतीमध्ये आई-मुलगीचाही सामना रंगाल होता. (shinde government minister sandipan bhumare’s daughter prerana pandit won in grampanchayat election)

अशातच बीड जिल्ह्यातून आणखी एक लक्षवेधी निकाल समोर येत आहे. दैठण ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे यांची विवाहित मुलगी प्रेरणा प्रतापसिंह पंडित या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमधून सरपंचपदी निवडून आलेल्या आहेत. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (ठाकरे गट) पॅनेलच्या उमेदवार शुभांगी निळकंठ पंडित यांचा पराभव करून त्या विजयी झाल्या आहेत.

हे वाचलं का?

पुतण्या पुन्हा काकांवर भारी! संदीप क्षीरसागरांची बाजी :

बीडमध्ये तीन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत काका आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केल्यानंतर पुतण्या संदीप क्षीरसागर काकांवर पुन्हा एकदा भारी ठरले आहेत. नवगन राजुरी जिल्हा परिषद सर्कल मधील नवगण राजुरी या होमपीचवर जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करत संदीप क्षीरसागर यांच्या गटाची एकहाती सत्ता आली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर या काका-पुतण्यातील सत्तासंघर्ष ग्रामपंचायत निवडणुकीतही पहावयास मिळाला. नवगन राजुरी जिल्हा परिषद सर्कलमधील नवगण राजुरी या होमपीचवर जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचा धुव्वा उडवत संदिप क्षीरसागर यांनी काकांना धोबीपछाड दिला. या सर्कलमधील चार ग्रामपंचायती आमदार क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

धनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये जनशक्तीचा विजय झाला. फक्त मुंबईत राहून ग्रामपंचायत निवडणुका जिंकता येत नाहीत. त्याला जनतेत उतरावं लागतं, असं म्हणतं संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांना टोला लगावला. तसंच राजुरी मतदारसंघातील पहिल्या फेरीत सर्वच ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्याच आहेत, असा विश्वास आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT