दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक ८० हजारांचं तिकिट काढून फ्लोरिडाहून मुंबईत, ‘या’ मेळाव्यात उपस्थिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मोठी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे हे आता शिवसेनाही काबीज करतील अशी शक्यता आहे. त्यामुळेच यंदा पहिल्यांदाच मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. पहिला मेळावा आहे तो उद्धव ठाकरेंचा जो शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजीपार्क मैदानावर होणार आहे. तर दुसरा मेळावा आहे तो एकनाथ शिंदे यांचा. जो बीकेसी मैदानावर होणार आहे. अशात फ्लोरिडामधला एक कट्टर शिवसैनिक दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. ८० हजारांचं तिकिट काढून तो मुंबईत आला आहे.

ADVERTISEMENT

अक्षय राणे हा शिवसैनिक फ्लोरिडाहून मुंबईत

मुंबईतल्या मीरा रोड या उपनगरात राहणारा अक्षय राणे याने हॉटेल मॅनेजमेंट केलं. त्यानंतर नोकरीसाठी तो फ्लोरिडात गेला आणि तिथेच स्थायिक झाला. मात्र फ्लोरिडात जाऊनही शिवसेनेबाबत असलेलं त्याच्या मनातलं प्रेम मुळीच कमी झालं नाही. अक्षय राणे हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानतो. त्यामुळेच शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार बाहेर पडल्यानंतर अक्षय कमालीचा अस्वस्थ झाला होता. शिवसेनेतच राहा उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका असं अक्षय राणे त्यांच्या मित्रांना फोन करून सांगत होता. आता फ्लोरिडातून उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. त्याच्या फेसबुक पोस्टमुळे ही चर्चा होते आहे.

हे वाचलं का?

८० हजारांचं तिकिट काढून अक्षय राणे मुंबईत

फ्लोरिडाहून ८० हजारांचं तिकिट काढून अक्षय राणे मुंबईत आला आहे. शिवसेनेचा म्हणजेच जो मेळावा उद्धव ठाकरे घेणार आहेत हा निकाल हायकोर्टाने दिल्यानंतर अक्षय राणेला खूप आनंद झाला. त्याने फ्लोरिडाहून मुंबईला येण्याचं नक्की केलं. ८० हजारांची तिकीट काढून मुंबईत अक्षय दाखल झाला आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला तो येणार आहे.

कोण आहे अक्षय राणे?

हॉटेल मॅनेजमेंट करून नोकरीसाठी अमेरिकेतल्या फ्लोरिडात वास्तव्य करणारा अक्षय राणे हा शिवसैनिक आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्याचं दैवत आहेत. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवरही त्याची श्रद्धा आहे. मातोश्री हे निवासस्थान आपल्याला पंढरपूरप्रमाणे वाटत असल्याचंही तो सांगतो. भारतापासून इतका लांब राहूनही ठाकरे कुटुंब आणि शिवसेना यांच्याविषयी वाटणारं प्रेम त्याच्या मनातून कमी झालेलं नाही. शिवसेनेसोबतच राहा उद्धव ठाकरे यांची साथ सोडू नका हे तो त्याच्या मित्रांना सातत्याने सांगतो.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT