Maharashtra MLC Election : आदित्य ठाकरेंसाठी ‘वरळी’ सोडणाऱ्या शिंदेना शिवसेनेकडून ‘गिफ्ट’; रामदास कदमांचा पत्ता कट

मुंबई तक

मुंबई: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपला मतदारसंघ सोडलेले शिवसेनेच्या माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेनं आता मोठं गिफ्ट दिलं आहे. पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या सुनील शिंदे यांना आता विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे दिग्गज नेते रामदास कदम यांचा मात्र पत्ता कापण्यात आला आहे. माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेने विधान […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपला मतदारसंघ सोडलेले शिवसेनेच्या माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेनं आता मोठं गिफ्ट दिलं आहे. पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या सुनील शिंदे यांना आता विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे दिग्गज नेते रामदास कदम यांचा मात्र पत्ता कापण्यात आला आहे.

माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेने विधान परिषदेची उमदेवारी दिल्याचं खात्रीलायक वृत्त समोर येत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुनील शिंदे यांनी 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी वरळीची जागा सोडली होती. याच मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी मोठा विजय मिळवला होता. या विजयात सुनील शिंदे यांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच आता त्यांना विधान परिषदेवर पाठवून पक्षानेही त्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

विधान परिषदेच्या ५ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 6 सदस्यांपैकी रामदास कदम आणि भाई जगताप यांच्या सदस्य पदाचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022 रोजी संपत आहे.

14 डिसेंबरला निकाल