4 महिला 'या' गोष्टी करताना रंगेहाथ सापडल्या, गावातलं सेक्स रॅकेट पाहून गावकरीही चकीत!
उत्तर प्रदेशमधील बरेली गावातील एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी यासंदर्भात माहिती मिळाली असता त्यांन यावर मोठी एक्शन घेतल्याचं समोर आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

उत्तर प्रदेशातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

4 महिलांना आक्षेपार्ह अवस्थेत रंगे हात...
UP News: उत्तर प्रदेशमधील बरेली गावातील एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी यासंदर्भात माहिती मिळाली असता त्यांन यावर मोठी एक्शन घेतल्याचं समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीसह 4 महिलांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी छापेमारी केली असताना त्या 5 व्यक्तींसोबत 3200 रुपये रक्कम, 4 मोबाईल फोन आणि आक्षेपार्ह साहित्य ताब्यात घेतलं आहे. अटक झालेली एक व्यक्ती त्या घराची मालक असल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.
पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती...
या प्रकरणासंदर्भात नवाबगंज सर्कल ऑफिसर गौरव सिंह यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एका घरात अनैतिक कृत्ये सुरू असल्याची गुप्त पोलिसांना माहिती मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांच्या टीमने त्या घरावर अचानक छापा टाकला. या छापेमारीत घराच्या मालकासह एकूण 5 जणांना रंगे हात पडकण्यात आलं.
गौरव सिंह यांच्या मते, अशा शहरी भागांमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश होणं अगदी सामान्य बाब आहे. मात्र, जेव्हा ग्रामीण भागात अशा बेकायदेशीर कृती चालू असल्याचे येणं गंभीर आणि चिंतेची बाब ठरते.
हे ही वाचा: पुतण्यासोबत पळून गेलेल्या काकीचे 3 नवे Video व्हायरल! लव्ह बर्ड्सचे रील पाहून सर्वच चक्रावले
छापेमारीत काय सापडलं?
पोलिसांच्या छापेमारीत घरातील आक्षेपार्ह साहित्य, रोख रक्कम आणि मोबाईल फोन पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. या सगळ्या गोष्टींचा सेक्स रॅकेट चालवण्यात वापर करण्यात आला होता. पोलिसांनी सगळ्या आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे रॅकेट किती काळापासून चालवलं जात होतं आणि त्याचे कनेक्शन कुठपर्यंत पसरलं आहे? याचाही पोलिस तपास करत आहेत.
हे ही वाचा: पतीपासून लपून लपून खायची गुटखा.. पतीने पकडलं पण पत्नीने केला मोठा कांड
अटक केलेल्या लोकांची चौकशी करून या प्रकरणातील इतर साथीदार आणि ग्राहकांची माहिती देखील पोलिसांकडून गोळा केली जात आहे. स्थानिक लोकांना अशा कारवायांबद्दल तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे जेणेकरून वेळीच कारवाई करता येईल.