Election Commission: Shiv Sena कोणाची शिंदे की ठाकरेंची?, आज ठरणार!
Election Commission likely to give a decision on Shiv Sena: नवी दिल्ली: महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा पेच अद्यापही कायम आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरू असताना दुसरीकडे निवडणूक आयोगासमोर (Election Commission) देखील एक महत्त्वाची सुनावाणी सुरू आहे. ज्याचा निकाल आज (17 जानेवारी) येण्याची दाट शक्यता आहे. ज्यानंतर हे स्पष्ट होईल की, शिवसेना (Shiv Sena) […]
ADVERTISEMENT

Election Commission likely to give a decision on Shiv Sena: नवी दिल्ली: महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा पेच अद्यापही कायम आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरू असताना दुसरीकडे निवडणूक आयोगासमोर (Election Commission) देखील एक महत्त्वाची सुनावाणी सुरू आहे. ज्याचा निकाल आज (17 जानेवारी) येण्याची दाट शक्यता आहे. ज्यानंतर हे स्पष्ट होईल की, शिवसेना (Shiv Sena) नेमकी कोणाची तसेच धनुष्यबाण चिन्ह मिळणार की नाही हे देखील स्पष्ट होईल. (shiv sena party whose shinde or thackeray group is central election commission is likely to give a decision)
शिवसेना आपलीच आहे असा दावा ठाकरे आणि शिंदे गटाकडून (Shinde Group) वारंवार करण्यात येत आहे. दोन्ही गटांनी आपआपली कागदपत्रं देखील आयोगापुढे सादर केली आहेत. तसेच दोन्ही 10 जानेवारीला झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांनी जोरदार युक्तिवाद केला होता. त्यानंतर आयोगाने पुढील सुनावणी 17 जानेवारीला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार आज आयोगासमोर पक्षाच्या नाव आणि चिन्हासाठी पुन्हा सुनावणी होईल आणि त्यानंतर आयोग आपला निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.
Nihar Thackeray: काकांविरोधात पुतण्या.. दिल्लीत जाऊन शिंदेंसाठी लढला!
त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणत्या गटाला मिळणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण या दोन गोष्टींमुळे राज्यातील संपूर्ण राजकारण बदलून जाणार आहे. अशावेळी दोन्ही गट दावा करत आहेत की, शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्यालाच मिळेल.